चिरंजीवी सरजाच्या गर्भवती पत्नीची भावूक पोस्ट व्हायरल, म्हणाली- मी तुझी वाट पाहतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 05:09 PM2020-06-19T17:09:56+5:302020-06-19T17:11:14+5:30

अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.

Meghna raj emotional post for husband chiranjeevi sarja who died | चिरंजीवी सरजाच्या गर्भवती पत्नीची भावूक पोस्ट व्हायरल, म्हणाली- मी तुझी वाट पाहतेय

चिरंजीवी सरजाच्या गर्भवती पत्नीची भावूक पोस्ट व्हायरल, म्हणाली- मी तुझी वाट पाहतेय

googlenewsNext

कन्नड चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी केवळ वयाच्या ३९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चिरंजीवी आणि  मेघना राज यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षं झाले आहेत.

मेघना ही गरोदर असून पतीच्या निधनानंतर अतिशय भावूक पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. मेघना राजने इन्स्टाग्रामवर चिरंजीवीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, 'चिरू, मी बर्‍याचदा प्रयत्न केला पण मला जे काय म्हणायचे आहे ते सांगण्यासाठी शब्द सापडले नाहीत. या जगातील कोणतेही शब्द तू माझ्यासाठी काय होतास हे सांगू शकत नाहीत. माझा मित्र, माझा प्रियकर, माझा साथीदार,  माझा नवरा - तू या सर्वांपेक्षा अधिक काही माझ्यासाठी होतास. तू माझ्या आत्म्याचा एक भाग आहेस चिरु. मी जेव्हा दरवाजाकडे पाहतो तेव्हा मला अनेक वेदना होतात. 'मी आलो' असे म्हणत तू आत येत नाहीस.

मी तुला नेहमी माझ्या आजूबाजूला असल्याचा भास होतो. तू माझ्यावर खूप प्रेम केलंस म्हणून मी तुला एकटे सोडू शकत नाही. 
आपलं बाळ हे आपल्या प्रेमाची निशाणी आहे. या प्रेमासाठी मी तुझी नेहमीच आभारी राहिन. मी तुला आपल्या मुलाच्या रुपात पुन्हा पृथ्वीवर आणण्याची प्रतीक्षा करु शकत नाही, मी तुझी वाट पाहत आहे आणि तूसुद्धा दुसर्‍या टोकाला माझी वाट पाहाशील. 
जोपर्यंत माझा श्वास सुरु आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. तू माझ्यात आहेस. आय लव्ह यू. . २ मे २०१८ ला मेघना आणि चिरंजीवी यांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. 

Web Title: Meghna raj emotional post for husband chiranjeevi sarja who died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.