मेगास्टार रजनीकांत यांच्या '2.0' चित्रपटाच्या डबिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 04:30 PM2016-12-28T16:30:42+5:302016-12-28T16:30:42+5:30

सुपरस्टार रजनीकांत  यांनी आगामी चिक्त्रपट ‘2.0’च्या डबिंगला सोमवारी सुरुवात केली आहे. ऑस्कर विजेता साउंड डिझायनर रेसुल पुकुट्टीने ट्विट करत ...

Megastar Rajinikanth's '2.0' debut begins with Dubbing | मेगास्टार रजनीकांत यांच्या '2.0' चित्रपटाच्या डबिंगला सुरुवात

मेगास्टार रजनीकांत यांच्या '2.0' चित्रपटाच्या डबिंगला सुरुवात

googlenewsNext
परस्टार रजनीकांत  यांनी आगामी चिक्त्रपट ‘2.0’च्या डबिंगला सोमवारी सुरुवात केली आहे. ऑस्कर विजेता साउंड डिझायनर रेसुल पुकुट्टीने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. मेगास्टार रजनीकांत यांच्या 2.0 या चित्रपटाचे डबिंग करण्यास चेन्नाईला जात आहे असे  रेसुलने ट्विट केले. हा चित्रपट बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा बजेट 400 कोटींचा आहे.



हा चित्रपट 2010मध्ये आलेल्या त्यांच्या रोबोट या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. याचित्रपटात रजनीकांत या चित्रपटात तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत  आहे तर अक्षय कुमार डॉक्टर रिचर्डच्या भूमिकेत झळकणार आहे. अक्षयने या चित्रपटासाठी प्रथमच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. शूटिंग संपल्यावर मेकअप काढायला अक्षयला 1 तास लागायचा. आजपर्यंत कोणत्याच चित्रपटासाठी फारसा मेकअप केला नव्हता. मात्र ‘2.0’साठी मला एवढा मेकअप करावा लागला की, त्याची तुलना मी 25 वर्षांचा एकत्र मेकअप असा करेन असे अक्षय कुमार म्हणाला होता. याचित्रपटात अ‍ॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रजनीकांत यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र दवाखान्यातून उपचार घेऊऩ त्याच दिवशी रात्री त्यांनी शूटिंग सुरु केले.  


हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये दिवाळीपर्यंत रिलीज होणार आहे. याचित्रपटाचे दिग्दर्शक एस.शंकर आहेत. संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे

Web Title: Megastar Rajinikanth's '2.0' debut begins with Dubbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.