​मेगास्टारचे आजारपण आणि खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 08:05 IST2016-02-21T15:05:47+5:302016-02-21T08:05:47+5:30

बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन गेली काही दिवस आजाराने त्रस्त आहेत. डॉक्टरांनी त्यांना सक्तीने आराम घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ...

Megastar disorders and depression | ​मेगास्टारचे आजारपण आणि खंत

​मेगास्टारचे आजारपण आणि खंत

लिवूड शहंशाह अमिताभ बच्चन गेली काही दिवस आजाराने त्रस्त आहेत. डॉक्टरांनी त्यांना सक्तीने आराम घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते झी अ‍ॅवॉर्ड सोहळ्याला हजर राहू नये शकले.

बिग बींच्या हस्ते अजय देवगणचे वडिल आणि स्टंट दिग्दर्शक वीरू देवगण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. हजर न राहू शकल्याची खंत त्यांनी ब्लॉगवर लिहून व्यक्त केली.

veeru

ते लिहितात, माझ्याा आजारपणामुळे पलंगावर खिळून पडलोय. हालचाल करणेही अवघड होऊन बसले. वीरू देववग यांना पुरस्कार प्रदान करण्याची संधी मी गमावल्याचे खूप दु:ख होत आहे. स्टंट करताना अ‍ॅक्टरच्या सुरक्षेला ते नेहमीच प्राधान्य द्यायचे. पुढे चालून ते निर्माते झाले. त्यांच्या चित्रपटात मी काम देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अ‍ॅक्शन स्टंटचे ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही.’

ते पुढे लिहतात की, आजाराने न केवळ शरीर पण आपला मेंदू, आत्माही थकातो. त्यामुळे प्रियजणांसोबत संवाद साधने कठीण होते. बरेच दिवस झाले मी ब्लॉग लिहू नाही शकलो. याचेही दु:ख आहे. पण लवकरच बरा होऊन तुमच्याशी संवाद पुन्हा पहिल्याप्रमाणे सुरू ठेवण्याची मी आशा व्यक्त करतो.

vreeru

Web Title: Megastar disorders and depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.