भेटा जॅकलिनच्या डुप्लिकेटला, हुबेहुब दिसते तिच्यासारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 14:03 IST2019-03-27T13:57:04+5:302019-03-27T14:03:39+5:30

अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये आता जॅकलिन शर्माचाही उल्लेख करावा लागेल. कारण आता अनुष्का पाठोपाठ जॅकलिनचीही लुक अ लाइक समोर आली आहे.

Meet Jacklin Sharma's duplicate, just like it looks like | भेटा जॅकलिनच्या डुप्लिकेटला, हुबेहुब दिसते तिच्यासारखी

भेटा जॅकलिनच्या डुप्लिकेटला, हुबेहुब दिसते तिच्यासारखी

एकाच चेह-याच्या आणि सेम टू सेम दिसणा-या सात व्यक्ती जगात असतात असं म्हटलं जातं. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये आता जॅकलिन शर्माचाही उल्लेख करावा लागेल. कारण आता अनुष्का पाठोपाठ जॅकलिनचीही लुक अ लाइक समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा सारखी दिसणारी लूक अ लाईक समोर आली होती. अनुष्का पाठोपाठ जॅकलिनचीही डुप्लिकेट असल्याचे पाहायला मिळतंय. खुद्द जॅकलिननेच तिच्यासारखी दिसणारी एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जॅकलिनच्या डुप्लिकेटचे अमांडा सर्नी असे नाव आहे. अमांडा ही अमेरिकन एक्ट्रेस आहे.शेअर केलेल्या  फोटोत दोघांनीही सेम पोज दिल्या आहेत. त्यामुळे सेम टु सेम जॅकलिन आणि अमांडा या जुळ्या बहिणी असल्याचे भासते. जॅकलिनने हा फोटो अमांडाला टॅग करत लिहीले आहे की, 'लवकरच तुला आता मला भेटण्यासाठी मुंबईत यावे लागणार आहे.' त्यावर लगेचच अमांडाने उत्तरही दिले आहे. तिने म्हटले आहे की, जॅकलिन तु शेअर केलेला फोटो खूपच फनी आहे. विश्वास ही बसत नाही.

 

अमांडा ही मुळची जर्मनीची आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. आता जॅकलिनला तिच्यासारख्या सेम टू सेम दिसणा-या अमांडाला कधी भेटणार याची नक्कीच उत्सुकता असणार हे मात्र नक्की.तुर्तास जॅकलिनचा आगामी 'ड्राइव' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुशांत सिंह राजपुतसह ती या सिनेमात झळकणार आहे.

Web Title: Meet Jacklin Sharma's duplicate, just like it looks like

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.