भेटा अक्षय कुमारच्या ‘अजब’ फॅनला; १८ दिवसांत त्याने पार केले ९०० किमीचा प्रवास!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 18:54 IST2019-09-01T18:51:03+5:302019-09-01T18:54:54+5:30
स्वत: सेलिब्रिटी देखील फॅन्सच्या अशा करामतींमुळे आश्चर्यचकित होतात. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, अशातच अक्षयकुमारचा म्हणजेच बॉलिवूडचा खिलाडी असलेल्या अक्कीचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी चक्क ९०० किमी चालत आला.

भेटा अक्षय कुमारच्या ‘अजब’ फॅनला; १८ दिवसांत त्याने पार केले ९०० किमीचा प्रवास!!
बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची फॅन फॉलोईंग असणे काही विशेष बाब नाही. मात्र, काही वेळेस असे काही होते की, स्वत: सेलिब्रिटी देखील फॅन्सच्या अशा करामतींमुळे आश्चर्यचकित होतात. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, अशातच अक्षयकुमारचा म्हणजेच बॉलिवूडचा खिलाडी असलेल्या अक्कीचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी चक्क ९०० किमी चालत आला. आता बघा आहे की नाही आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट. तर मग पाहा तुम्हीही त्याचा अक्कीसोबतचा हा खास फोटो....
अभिनेता अक्षय कुमारने रविवारी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्याचा चाहता परबत हा त्याच्यासोबत बोलत असतो. परबत अक्षय कुमारला भेटण्यासाठी १८ दिवसांत ९०० किमी अंतर चालत आला होता. परबतने अक्षयला सांगितले की, तो दिवसाला ५० किमी चालतो. त्याने मुंबईपर्यंत चालत येऊन त्याची भेट घेतली यासाठी की तो देखील अक्षयप्रमाणेच सर्वांना फिटनेससाठी प्रोत्साहन देण्याचे काम करू इच्छित होता.
https://www.instagram.com/tv/B13DpzInb32/?utm_source=ig_web_options_share_sheet
अक्षयने या व्हिडीओत परबतला विचारले की, मी रविवारी तुला भेटेल हे तुला कसे काय वाटले?’ त्यावर तो म्हणाला,‘सर मी तुमचा फॅन आहे. मला तुमच्याबद्दल सगळं काही माहित आहे. त्यामुळे तर मी शनिवारी रात्री देखील चालत होतो. पावसांतही मी थांबलो नाही. ’ अक्षयने एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिले की,‘मी अशा गोष्टींचे खूप कौतूक करतो. मलाही चाहत्यांचे प्रेम हवेहवेसे वाटते. पण तुम्हाला विनंती आहे की, कृपया कुणीही असे करू नये. चाहत्यांनो तुम्हाला विनंती आहे की, आपली एनर्जी आपले ध्येय गाठण्यासाठी खर्च करा.’