माध्यमांवर रागावली प्राची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 18:03 IST2016-11-08T18:03:43+5:302016-11-08T18:03:43+5:30

‘अजहर’ फेम प्राची देसाई सध्या मीडियावर प्रचंड रागावलीय म्हणे. तिच्या रागावण्याचे कारण म्हणजे, तिच्याबद्दल मीडियात सध्या सुरु असलेली चर्चा. ...

Media angry? | माध्यमांवर रागावली प्राची?

माध्यमांवर रागावली प्राची?

जहर’ फेम प्राची देसाई सध्या मीडियावर प्रचंड रागावलीय म्हणे. तिच्या रागावण्याचे कारण म्हणजे, तिच्याबद्दल मीडियात सध्या सुरु असलेली चर्चा. होय, ‘रॉक आॅन २’ चित्रपट म्हणजे फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर यांच्या व्यक्तिरेखांची प्रेमकहानी असे निर्मात्यांनी घोषित केले होते. या घोषणेमुळे प्राची देसाई निर्मात्यांवर नाराज झाली, अशी चर्चा मीडियात पसरली आणि  प्राचीचा पारा चढला. मग काय? माध्यमांनी काहीही अफवा पसरवल्या तरीही मी दुखावलेले नाही, हेच खरे आहे, असे सांगून तिने आपला हा संताप व्यक्त केला.

आठ वर्षांपूर्वी ‘रॉक आॅन’च्या माध्यमातूनच मी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. फरहानच्या भूमिकेची पत्नी साक्षीची भूमिका मी केली होती. ‘रॉक आॅन’ला मिळालेला प्रतिसाद पाहता ‘रॉक आॅन’चा सिक्वेल येणार हे कळाल्यावर मला प्रचंड आनंद झाला होता. या चित्रपटासंदर्भात मला कोणतीही भावनिक बांधिलकी नसती तर मला एवढा आनंद झालाच नसता. ‘रॉक आॅन २’ चा भाग असणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. माझी भूमिका दुसºया कुठल्या अभिनेत्रीनं पुढे साकारणं मला रूचलं नसतं. मलाच ती भूमिका पुढे नेण्याची इच्छा होती. मात्र, मीडियानं माझ्या इच्छेचा वेगळाच अर्थ काढला अन् भलताच गैरसमज करून घेतलाय,असेही ती म्हणाली. 

‘रॉक आॅन’च्या टीममधील सहकलाकार अर्जुन रामपाल आणि पूरब कोहली हे देखील या अफवांमुळे त्रस्त होते. मात्र, प्राचीने केलेल्या खुलास्यानंतर त्यांनीही त्यांची मतं सोशल मीडियावर शेअर केली. 

Web Title: Media angry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.