Anshuman Jha : ओटीटीच्या ‘मस्तराम’ने अमेरिकेत बांधली लग्नगाठ, लग्नमंडपात वधूची झक्कास एन्ट्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:06 IST2022-11-02T18:04:06+5:302022-11-02T18:06:02+5:30

Mastram Fame Actor Anshuman Jha Wedding : ‘लव्ह सेक्स और धोखा’  या चित्रपटात झळकलेला आणि ‘मस्तराम’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेला अभिनेता अंशुमन झा याने नुकतीच लग्नगाठ बांधली.

Mastram Fame Actor Anshuman Jha Ties Knot With Fiancee Sierra Winters In Us | Anshuman Jha : ओटीटीच्या ‘मस्तराम’ने अमेरिकेत बांधली लग्नगाठ, लग्नमंडपात वधूची झक्कास एन्ट्री 

Anshuman Jha : ओटीटीच्या ‘मस्तराम’ने अमेरिकेत बांधली लग्नगाठ, लग्नमंडपात वधूची झक्कास एन्ट्री 

 Mastram Fame Actor Anshuman Jha Wedding :   ‘लव्ह सेक्स और धोखा’  या चित्रपटात झळकलेला आणि ‘मस्तराम’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेला अभिनेता अंशुमन झा (Anshuman Jha) याने नुकतीच लग्नगाठ बांधली. गेल्या 29ऑक्टोबरला  ख्रिश्चन पद्धतीने हा लग्नसोहळा पार पाडला. अंशुमन व त्याची  प्रेयसी सिएरा विंटर्स दोघांनी अमेरिकेत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. अंशुमनची पत्नी सिएरा एक वीगन शेफ व योगा टीचर आहे. दोघंही दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 2020 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्यांचं लग्न लांबणीवर पडलं होतं. अखेर 29 तारखेला सगळं काही जुळून आलं आणि दोघं लग्नबंधनात अडकले.

अंशुमनने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. नवरी छोट्या नावेतून लग्नस्थळी आली, तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडीओही अंशुमनने शेअर केला आहे.

आता अंशमन व सिएरा दोघंही भारतीय पद्धतीने लग्न करणार आहेत. मार्चमध्ये दोघंही भारतात येणार आहेत. मग मुंबईत भारतीय पद्धतीने लग्न व रिसेप्शन  होणार आहे. तूर्तास या कपलने हनिमूनची तयारी चालवली आहे. लवकरच हे कपल अलास्का येथे हनिमूनसाठी रवाना होणार आहे.

अंशुमन लवकरच ‘लकडबग्घा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार आहे. अंशुमन हा अभिनेता आहे. सोबत दिग्दर्शक व निर्माता अशीही त्याची ओळख आहे. फर्स्ट रे फिल्म्सच्या बॅनरखाली ‘मोना डार्लिंग’ हा सिनेमा त्याने प्रोड्यूस केला होता. 2020 साली ‘मस्तराम’ सीरिजमुळे अंशुमन प्रकाशझोतात आला. लवकरच तो ‘हम भी अकेले तुम भी अकेले’मध्ये जरीन खानसोबत दिसणार आहे.

Web Title: Mastram Fame Actor Anshuman Jha Ties Knot With Fiancee Sierra Winters In Us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.