Masakali 2.0 : ‘मसकली’चे नवे व्हर्जन पाहून का चढला ए़आऱ रहमान यांचा पारा?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 03:23 PM2020-04-09T15:23:44+5:302020-04-09T15:26:14+5:30

नवे की जुने तुम्हाला कोणते व्हर्जन आवडते ते बघा

Masakali 2.0 :original makers of masakali a r rahman not happy with tanish bagchi remix-ram | Masakali 2.0 : ‘मसकली’चे नवे व्हर्जन पाहून का चढला ए़आऱ रहमान यांचा पारा?  

Masakali 2.0 : ‘मसकली’चे नवे व्हर्जन पाहून का चढला ए़आऱ रहमान यांचा पारा?  

googlenewsNext
ठळक मुद्देमसकली हे गाणे ‘दिल्ली 6’ या सिनेमातील आहे. 

जुन्या गाजलेल्या गाण्यांचे रिमिक्स ही जणू सध्याची फॅशन झालीय. आता आणखी एका हिंदी गाण्याचे नवे रिमिक्स व्हर्जन आलेय. सोशल मीडियावर हे नवे व्हर्जन धुमाकूळ घालतेय.
होय, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री तारा सुतारिया यांचे ‘मसकली 2.0’ हे गाणे सध्या जोरदार चर्चेत आहे. तनिष्क बागचीच्या या गाण्याला केवळ दोन दिवसांत 14 मिलियन ह्युज मिळाले.

एकीकडे हे गाणे टॉप ट्रेंडिंग्समध्ये आहे तर दुसरीकडे दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान या गाण्यावर जाम भडकले आहेत. होय, याचे कारण म्हणजे, मसकली या ओरिजनल गाण्याला रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. आपल्या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन ऐकल्यानंतर ते आपली नाराजी लपवू शकले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर याबद्दलचा संताप व्यक्त केला.

‘ओरिजनल मसकली एन्जॉय करा. कुठलाही शॉर्टकट्स नाही. अनेक रात्री जागून हे गीत लिहिले गेले. एकदा नाही तर अनेकदा लिहिले गेले. 200 पेक्षा अधिक म्युझिशियन्स, 365 दिवस क्रिएटीव्ह ब्रेन स्ट्रॉमिंग सेशननंतर हे गाणे तयार झाले. जेणेकरून ते आत्ताच्याच नाही तर येणा-या पिढीलाही आवडेल,’ असे रहमान यांनी ट्विटमध्ये लिहिले. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी या गाण्याचे ओरिजनल मेकर्स प्रसून जोशी, मोहित चौहान आणि ओम प्रकाश मेहरा यांनाही टॅग केले.
मसकली हे गाणे ‘दिल्ली 6’ या सिनेमातील आहे. सोनम कपूर व अभिषेक बच्चन स्टारर हा सिनेमा 2009 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील मसकली हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते.


  

Web Title: Masakali 2.0 :original makers of masakali a r rahman not happy with tanish bagchi remix-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.