पायल-संग्रामचे लग्न पुढे ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:11 IST2016-01-16T01:18:20+5:302016-02-06T12:11:17+5:30

                पायल रोहतगी आणि संग्राम सिंग हे दोघे नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढतील ...

The marriage of Payal Sangram was postponed | पायल-संग्रामचे लग्न पुढे ढकलले

पायल-संग्रामचे लग्न पुढे ढकलले


/>                पायल रोहतगी आणि संग्राम सिंग हे दोघे नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढतील अशी अपेक्षा होती, मात्र काही कारणास्तव हे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. पायल म्हणाली, संग्राम हा येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या कुस्ती स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असल्याने तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. आम्ही आमच्या करिअरकडे अधिक लक्ष देत आहोत आणि आनंदीही आहोत. आम्ही लग्न करतोय अथवा नाही हे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे नाही. आमचा लग्न सोहळा हा केवळ औपचारिकतेचा भाग आहे. पायल जाने क्या होगा आगेमध्ये काम करते आहे. 'कॉमेडी हा वेगळा भाग आहे. मी अशी भूमिका करू शकते का हे मला पहावयाचे होते, म्हणून हा रोल केला. प्रेमाच्या त्रिकोणात नेहमीच आकर्षण राहिले आहे. यापूर्वी आपण जे केले नाही, ते करणे उत्सुकतेचा भाग आहे असे ती सांगते.

Web Title: The marriage of Payal Sangram was postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.