बॉबी डार्लिंग-रमणिक यांचा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 01:19 IST2016-02-24T08:19:10+5:302016-02-24T01:19:10+5:30
बिग बॉस सीझन-1 मधील बॉबी डॉर्लिंग आठवते? नुकतेच तिने तिचा मित्र भोपाळ येथील उद्योजक रमणिक शर्मा याच्याशी विवाह केला ...
.jpg)
बॉबी डार्लिंग-रमणिक यांचा विवाह
भोपाळ येथे त्यांनी 11 फेब्रुवारी रोजी एका खासगी समारंभात गुपचाप विवाह केला. यावेळी जवळचे मित्र आणि नातेवाइकांनाच निमंत्रित करण्यात आले होते. बॉबीने तिचे नाव बदलले असून ती आता पाखी झाली आहे.
या दोघांनीही भोपाळमध्येच बंगला विकत घेतला असून तिथेच स्थायिक होण्याचा त्यांचा विचार आहे. रमणिक हा बॉबीपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. बॉबी 43 तर रमणिक 28 वर्षांचा आहे. या दोघांनी घरच्यांच्या परवानगीने विवाह केला असल्याचे सांगितले आहे.
बॉबी हिने 18 चित्रपटांत ‘गे’ रोल केल्याने तिचे नाव ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्डस्’मध्ये सामिल करण्यात आले आहे. यानंतर मात्र बॉबीने लिंग परिवर्तन के ले. ती बॉलिवूडमधील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री आहे हे विशेष.