मराठमोळ्या या अभिनेत्याने चक्क थिएटरमधील पायऱ्यांवर बसून पाहिला शाहरुख खानचा 'जवान'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 06:35 PM2023-09-08T18:35:46+5:302023-09-08T18:36:35+5:30

Jawan Movie : ‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १२९.६ कोटींची कमाई केली आहे.

Marathi Actor sat on the steps of the theater and watched Shah Rukh Khan's 'Jawan'. | मराठमोळ्या या अभिनेत्याने चक्क थिएटरमधील पायऱ्यांवर बसून पाहिला शाहरुख खानचा 'जवान'

मराठमोळ्या या अभिनेत्याने चक्क थिएटरमधील पायऱ्यांवर बसून पाहिला शाहरुख खानचा 'जवान'

googlenewsNext

सध्या शाहरूख खान(Shah Rukh Khan)च्या जवानचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळत आहे. बहुप्रतीक्षित जवान (Jawan Movie) चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. दमदार स्टार कास्ट आणि उत्तम कथा असलेला जवान प्रेक्षकांच्या अपेक्षेला खरा उतरल्याचं चित्र आहे. या चित्रपटाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल होत आहेत. या चित्रपटाची प्रशंसा बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित, कंगना राणौतनेही केली आहे. इतकेच नाही तर किंग खानच्या चाहत्यांसोबत कलाकारांमध्येही जवानची क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठमोळ्या अभिनेत्याने तर चक्क थिएटरमध्ये पायऱ्यांवर बसून जवान चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला आहे. खुद्द त्यानेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. हा मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर.

अभिनेता शरद केळकरने इंस्टाग्रामवर थिएटरमधला फोटो शेअर करत लिहिले की, शिड्यांवर बसून का होईना आजच पाहायला होता जवान. शाहरुख खान सर तुम्ही अप्रतिम काम केले आहे. शरद केळकरचा हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्याची ही पोस्ट पाहून काहींनी कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे. एका युजरने म्हटले की, एवढं प्रेम ‘सुभेदार’ चित्रपटला दिलं असतं तर बरं झालं असतं. तर दुसऱ्या युजरने लिहीले की, आता फक्त एकच ध्यास मराठी चित्रपट हाच आमचा श्वास.

‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १२९.६ कोटींची कमाई केली आहे. दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी, सुनिल ग्रोव्हर आणि मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

Web Title: Marathi Actor sat on the steps of the theater and watched Shah Rukh Khan's 'Jawan'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.