"Animal तर प्रत्येकात असतोच, पण..." प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 06:09 PM2023-12-14T18:09:35+5:302023-12-14T18:11:42+5:30

'ॲनिमल' चित्रपटासंदर्भात अनेक सेलिब्रिटीही पोस्ट करत आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

marathi actor santosh juvekar post on ranbir kapoor animal movie goes viral | "Animal तर प्रत्येकात असतोच, पण..." प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

"Animal तर प्रत्येकात असतोच, पण..." प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या 'ॲनिमल' सिनेमाने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातील सीन्स, गाणी आणि डायलॉगही प्रचंड व्हायरल झाले आहेत. रणबीरबरोबरच या सिनेमात बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'ॲनिमल' चित्रपटासंदर्भात अनेक सेलिब्रिटीही पोस्ट करत आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

झेंडा, मोरया, ३६ गुण, एक तारा, शर्यत अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटातून अभिनेता संतोष जुवेकरने अभिनयाचा ठसा उमटवला. संतोष सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टची माहिती तो पोस्टमधून चाहत्यांना देत असतो. आता संतोषने 'ॲनिमल' चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. संतोषने त्याचा मिरर सेल्फी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्याने 'ॲनिमल'मधील बॉबी देओलचं लोकप्रिय ठरलेलं जमाल कुडू हे गाणं टाकलं आहे. "तसतर animal प्रत्येकात असतोच पण कधीतरी असा अचानक स्वतःला आरशात बघताना दिसतो. थोडा Animal trend", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, 'ॲनिमल'सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. संदीप वांगा रेड्डीच्या या सिनेमाने पहिल्या दिवासापासूनच बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली होती. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ४६७ कोटींची कमाई केली आहे. 
 

Web Title: marathi actor santosh juvekar post on ranbir kapoor animal movie goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.