​दिशा पटनीचा हा ‘कारनामा’ ऐकून अनेक अभिनेत्रींचा होईल जळफळाट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:41 IST2017-09-27T07:11:50+5:302017-09-27T12:41:50+5:30

टायगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड यापलीकडे भलेही अभिनेत्री दिशा पटनीची फार मोठी ओळख नाही. पण म्हणून तिच्या जवळ मोठ मोठ्या प्रोजेक्टची ...

Many actresses will ignore this 'Parnamma' direction. | ​दिशा पटनीचा हा ‘कारनामा’ ऐकून अनेक अभिनेत्रींचा होईल जळफळाट!!

​दिशा पटनीचा हा ‘कारनामा’ ऐकून अनेक अभिनेत्रींचा होईल जळफळाट!!

यगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड यापलीकडे भलेही अभिनेत्री दिशा पटनीची फार मोठी ओळख नाही. पण म्हणून तिच्या जवळ मोठ मोठ्या प्रोजेक्टची कमतरता आहे, असे मात्र मुळीच नाही. दिशाने आत्तापर्यंत मोजून दोन सिनेमे केलेत पण तरिही तिच्या घरापुढे निर्मात्यांची रांग असते. अर्थात दिशा अतिशय समजून उमजून चित्रपटांची निवड करते. अलीकडे दिशाबद्दल एक बातमी आली. बातमी होती ती, दिशाने श्रुती हासनला रिप्लेस केल्याची. आता याच संदर्भाने आणखी एक अपडेट बातमी आहे. होय, दिशाने केवळ श्रुतीला रिप्लेस केले नाही तर त्याबदल्यात एक मोठ्ठी रक्कम आपल्या पदरात पाडून घेतलीय.

होय, चर्चा खरी मानाल तर दिशाने ‘संघमित्रा’ हा सिनेमा साईन केला आहे आणि यासाठी मनासारखी तगडी फी वसूल केली आहे. ही फी श्रुती हासनपेक्षाही अधिक असल्याचे कळते. दिशा तर यामुळे जाम खूश आहे. पण एका नव्या अभिनेत्रीला इतकी मोठी रक्कम मिळालेली पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आधी श्रुतीने ‘संघमित्रा’ साईन केला होता. या चित्रपटाचे फर्स्ट लूक लॉन्च करायला ती कान्समध्ये पोहोचली होती. यावेळी खुद्द ए. आर. रहेमान  श्रुतीसोबत कान्सच्या रेड कार्पेटवर उतरला होता. ‘संघमित्रा’चा फर्स्ट लूक लॉन्च करताना श्रुती या चित्रपटाबद्दल भरभरून बोलली होती.  एकंदर काय तर, श्रुती ‘संघमित्रा’बद्दल कमालीची उत्सूक होती. पण कान्सवरून परतल्यानंतर आठवडा होत नाही तोच श्रुतीने हा चित्रपट सोडल्याची धक्कादायक बातमी आली होती.  श्रुतीच्या बाजुने बोलणाºयांच्या मते, ‘संघमित्रा’साठी बराच वेळ हवा होता. पण चित्रपटाची टीमने श्रुतीला ना पूर्ण स्क्रिप्ट दिली होती, ना डेट्सचे कॅलेंडर. त्यामुळे  श्रुतीने हा चित्रपट सोडणेच योग्य समजले. ‘संघमित्रा’च्या मेकर्सने मात्र वेगळीच स्टोरी ऐकवली होती,श्रुती हासन या चित्रपटासाठीसाठी दोन वर्षे द्यायला तयार नव्हती. त्यामुळे तिने चित्रपट सोडला, असे मेकर्सने म्हटले होते. आता श्रुतीच्या बदल्यात या चित्रपटात दिशाची वर्णी लागली आहे. 

ALSO READ : ​It's shocking! ​‘या’ मुलीसाठी टायगर श्रॉफ सोडणार आई-वडिलांचे घर!!

Web Title: Many actresses will ignore this 'Parnamma' direction.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.