संजय लीला भन्साळींच्या 'देवदास'ची मनोज वाजपेयींना होती ऑफर;पण अभिनेत्याने दिला नकार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:46 AM2024-04-23T10:46:12+5:302024-04-23T10:46:47+5:30

मनोज वाजपेयींनी 'या' कारणामुळे नाकारला संजय लीला भन्साळींचा देवदास सिनेमा

manoj bajpayee rejected sanja leela bhansali devdas movie due to this reason | संजय लीला भन्साळींच्या 'देवदास'ची मनोज वाजपेयींना होती ऑफर;पण अभिनेत्याने दिला नकार, कारण...

संजय लीला भन्साळींच्या 'देवदास'ची मनोज वाजपेयींना होती ऑफर;पण अभिनेत्याने दिला नकार, कारण...

संजय लीला भन्साळी यांच्या अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे २००२ साली प्रदर्शित झालेला 'देवदास'. पारो, चंद्रमुखी आणि देवदास यांच्या लव्हस्टोरीवर चाहते फिदा होते. आजही हा सिनेमा आणि त्यातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांना ऑफर करण्यात आला होता. पण, मनोज वाजपेयींनी हा सिनेमा करण्यास नकार दिला. 

'देवदास' ही भूमिका किंग खानने अजरामर केली. संजय लीला भन्साळींच्या या सिनेमात देवदास साकारण्याची इच्छा मनोज वाजपेयींनी बोलून दाखवली होती. भन्साळींनी मनोज वाजपेयींना देवदास सिनेमाची ऑफरही दिली होती. पण, त्यांना देवदास या भूमिकेसाठी विचारणा झाली नव्हती. देवदास सिनेमातील एका दुसऱ्या सहाय्यक भूमिकेची ऑफर मनोज वाजपेयींना देण्यात आली होती. तेव्हा मनोज वाजपेयी सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत होते. त्यामुळेच देवदासमध्ये सहाय्यक भूमिका केल्यास त्यांच्या हिरोच्या इमेजला तडा जाऊ शकतो, असं मनोज वाजपेयींनी न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. याच कारणामुळे मनोज वाजपेयींनी देवदास सिनेमाला नकार दिला होता. 

बॉलिवूडनंतर आता मनोज वाजपेयी ओटीटी गाजवत आहेत. 'द फॅमिली मॅन' ही त्यांची वेब सीरिज प्रचंड गाजली. अलिकडेच 'किलर सूप' या सीरिजमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. काही दिवसांपूर्वीच ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली होती.  

Web Title: manoj bajpayee rejected sanja leela bhansali devdas movie due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.