"हर खाँसी कोरोना नही होती",मनिषा कोइरालाने टेस्ट केल्यानंतर जे काही घडले ते पाहून म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 04:21 PM2020-10-13T16:21:01+5:302020-10-13T16:21:57+5:30

'कोविड 19' च्या लसीसाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. खुद्द मनिषानेच आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. 

Manisha koirala Reactive Approach Towards Corona Gets Herself Tested after little cough | "हर खाँसी कोरोना नही होती",मनिषा कोइरालाने टेस्ट केल्यानंतर जे काही घडले ते पाहून म्हणाली...

"हर खाँसी कोरोना नही होती",मनिषा कोइरालाने टेस्ट केल्यानंतर जे काही घडले ते पाहून म्हणाली...

googlenewsNext

कोरोना व्हायरसची भीती जगभर पसरली आहे. सर्दी आणि खोकला होताच कोरोना झाला की काय ?अशी भीती मनात भरते. देशात अद्याप कोरोना विषाणूची 50 हजांराहून अधिक रूग्ण आहेत. तर दुसरीकडे 'कोविड 19' च्या लसीसाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. खुद्द मनिषानेच आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. 

मनीषा कोइरालाने सांगितले की,  'मला किरकोळ खोकला आला होता. पण मला भीती वाटली. त्यामुळे तातडीने कोविड चाचणी केली. देवाचे आभार, माझी चाचणी नेगिटीव्ह आली आहे.  मनीषा कोइरालाने केलेल्या ट्विटवर चाहत्यांच्या कमेंटसचा वर्षाव सुरू आहे. मनीषा कोईरालाच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, वाचून आनंद झाला. आपल्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना.

वयाच्या पन्नाशीतही मनिषा कोईराला फारच ग्लॅमरस दिसते. इतरांप्रमाणे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. बर्‍याचदा तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसह शेअर करत असते. मनीषा कोईरालाने 1991 मध्ये 'सौदागर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते.

कॅन्सरने मला मृत्यू नव्हे, जगायचे कसे ते शिकविले-मनिषा कोईराला

कॅन्सरसारखा आजार झाला आहे हे जेव्हा कळते तेव्हा आता सर्वकाही संपले आहे अशी भावना निर्माण होते. अशावेळी कुटुंबीय आणि समाजाचे पाठबळ आवश्यक असते. कॅन्सर बरा करण्यासाठी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार प्रत्येक उपचाराचा सामना केला. काही दिवसानंतर मनातील भीती दूर झाली. अखेर या आजारातून मी पूर्णत: बरी झाले.

'संजू' या चित्रपटातून मी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाले. प्रबळ इच्छाशक्तीतून हे शक्य झाले. कुठल्याही आजाराला समोरे जाताना हिंमत सोडू नका, स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि या समाजासाठी मला जागायचे आहे, असा सकारात्मक विचार करा, असे आवाहन यावेळी कोईराला यांनी केले.

Also Read: हॅपी बर्थ डे मनीषा कोईराला...! पाहा, ‘इलू इलू गर्ल’चे कधीही न पाहिलेले फोटो

Web Title: Manisha koirala Reactive Approach Towards Corona Gets Herself Tested after little cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.