मनीषा कोईरालाचे फेसबुकवरून जुळले लग्न; दोन वर्षांतच झाला घटस्फोट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 18:16 IST2017-08-17T12:46:33+5:302017-08-17T18:16:33+5:30

अभिनेत्री मनीषा कोइरालाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९१ मध्ये ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया मनीषाचा ...

Manisha Koirala gets married on Facebook; Divorce in two years! | मनीषा कोईरालाचे फेसबुकवरून जुळले लग्न; दोन वर्षांतच झाला घटस्फोट !

मनीषा कोईरालाचे फेसबुकवरून जुळले लग्न; दोन वर्षांतच झाला घटस्फोट !

िनेत्री मनीषा कोइरालाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९१ मध्ये ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया मनीषाचा हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला होता. तिचा ‘सौदागर’ त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आल्या. एक काळ असा होता की, मनीषाने बॉलिवूडमधील टॉप टेन अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविले होते. ‘छोटीशी लव्ह स्टोरी’, ‘अकेले हम अकेले तूम’, ‘अग्निसाक्षी’, ‘गुप्त’, ‘दिल से’, ‘लज्जा’ आणि ‘मन’ यांसारखे सुपरहिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. मात्र हा यशस्वी प्रवास ती पुढे कायम ठेवू शकली नाही. मनीषाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. ज्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. त्यामुळे ती अनेक वाईट सवयींच्या आहारीदेखील गेली. 



सम्राट दहल नावाच्या एका नेपाळी बिझनेसमॅनबरोबर तिने १९ जून २०१० मध्ये विवाह केला. सूत्रानुसार मनीषा आणि सम्राट हे पहिल्यांदा फेसबुकच्या माध्यमातून भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. पुढे २०१२ मध्येच त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर एका मुलाखतीत मनीषाने म्हटले होते की, ‘माझ्या घटस्फोटासाठी मी स्वत: जबाबदार आहे. जर तुमच्या नात्यात गोडवा नसेल तर तुम्ही विभक्त होणे अधिक योग्य असते.’ 



२०१२ नंतर मनीषाची प्रकृतीत अचानक खालावत गेली. त्यानंतर ती तिच्या भावासोबत काठमांडू येथील रुग्णालयात गेली. काही दिवसांनंतर हे स्पष्ट झाले की, मनीषाला कर्करोग झाला. पुढे ती उपचारासाठी अमेरिकेला गेली. अशातही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सातत्याने तिच्या चाहत्यांच्या संपर्कात होती. उपचारानंतर मनीषाची प्रकृती ठणठणीत झाली. आता ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. नुकताच तिचा ‘डियर माया’ हा चित्रपट रिलीज झाला होता. परंतु बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने फारशी कमाल केली नव्हती. मात्र चित्रपटातील मनीषाच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले गेले. आता पुन्हा एकदा ती एका बिग बजेट चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्याची शूटिंग तिने पूर्ण केल्याचे समजते. 

Web Title: Manisha Koirala gets married on Facebook; Divorce in two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.