कास्टिंग काउचवर मंदिरा बेदीने म्हटले, ‘टाळी एका हाताने वाजत नाही’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 18:29 IST2018-02-01T12:59:42+5:302018-02-01T18:29:42+5:30
बॉलिवूडमध्ये नेहमीच कास्टिंग काउचशी संबंधित बातम्या समोर येत असतात. या प्रकरणांमध्ये बºयाचशा अभिनेत्रींचे म्हणणे असते की, काम मिळवून देण्याचे ...

कास्टिंग काउचवर मंदिरा बेदीने म्हटले, ‘टाळी एका हाताने वाजत नाही’!
ब लिवूडमध्ये नेहमीच कास्टिंग काउचशी संबंधित बातम्या समोर येत असतात. या प्रकरणांमध्ये बºयाचशा अभिनेत्रींचे म्हणणे असते की, काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून आमचे लैंगिक शोषण केले गेले. मात्र आता या प्रकरणात अभिनेत्री मंदिरा बेदी हिने एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. होय, मंदिराने हे स्पष्ट केले की, कास्टिंग काउच प्रकरणात केवळ एकट्याचीच चूक नसते. तिच्या मते, दोघांची सहमती असल्याशिवाय असे घडूच शकत नाही. मंदिराच्या मते, ती या इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही काळापासून आहे. माझ्याशी आतापर्यंत कोणीही अशाप्रकारची चर्चा केली नाही.
मंदिरा सध्या वेब सिरीज ‘वोडका डायरीज’मध्ये बघावयास मिळत आहे. ती या वेबसिरीजमध्ये खूपच बोल्ड अंदाजात बघावयास मिळत आहे. तिने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी गेल्या २३ वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करीत आहे. माझ्यावर कधीच असा प्रसंग उद्भवला नाही. कोणीही मला अशाप्रकारची आॅफर दिली नाही. मी कधीच त्या स्थानी राहिली नाही की, लोकांनी मला काम देण्याच्या मोबदल्यात माझे शोषण करावे.
![]()
पुढे बोलताना मंदिराने म्हटले की, ‘तुम्ही एकट्या व्यक्तीवर याबाबतचा ठपका ठेवू शकत नाही. कारण कोणीही तुमच्याकडे यावं अन् कॉम्प्रोमाइजविषयी बोलावं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मला असे वाटते की, जर एखाद्याने तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्याची आॅफर दिली तर तुम्ही राजी झाल्याशिवाय हा प्रकारच घडू शकत नाही.’ मंदिराने दूरदर्शनवरील ‘शांती’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. आतापर्यंत तिने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले. मंदिरा अभिनयाबरोबर स्पोर्ट्स इव्हेंटमध्येही सहभागी होते. बºयाचदा तिला अॅँकरिंग करताना बघण्यात आले आहे.