​ममता कुलकर्णीचे टिनू वर्मासोबत होते अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 15:21 IST2017-06-07T09:51:02+5:302017-06-07T15:21:02+5:30

ममता कुलकर्णी ही इंड्स्ट्रीत आल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीसोबत तिचे नाव जोडण्यात आले. तिने एका मासिकाच्या कव्हरसाठी बोल्ड शूट ...

Mamta Kulkarni's Tinnu Verma was in the affair | ​ममता कुलकर्णीचे टिनू वर्मासोबत होते अफेअर

​ममता कुलकर्णीचे टिनू वर्मासोबत होते अफेअर

ता कुलकर्णी ही इंड्स्ट्रीत आल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीसोबत तिचे नाव जोडण्यात आले. तिने एका मासिकाच्या कव्हरसाठी बोल्ड शूट केले होते. त्यानंतर ती तिच्या विविध वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असायची. त्याकाळात ममताचे अनेक अभिनेत्यांसोबत असलेले अफेअरदेखील प्रचंड गाजले होते. 
ममता कुलकर्णीचे त्या काळातील अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले होते. पण त्याचसोबत एका अॅक्शन डायरेक्टरसोबतचे तिचे प्रेमप्रकरण हा तर त्या काळातला चर्चेचा विषय बनला होता.
अॅक्शन डायरेक्टर टिनू वर्माने चायना गेट या चित्रपटासाठी काम केले होते. याच चित्रपटाच्या वेळी ममता आणि टिनूची ओळख झाली होती. टिनूचे त्यावेळी लग्न झाले असून त्याला दोन मुले होती. तरीही तो ममताच्या मागे वेडा झाला होता. 
ममता आणि टिनूच्या अफेअरविषयी त्याची पत्नी वीणाला देखील कळले होते आणि त्यावरून टिनू आणि तिच्यात अनेक वेळा भांडणे देखील झाली होती. ममताच्या मेकअपमनच्या खोलीत वीणाने ममता आणि टिनूला एकत्र पाहिले होते आणि त्यावरून तिने चांगलाच तमाशा केला होता. पण या दोघांचे कधीच अफेअर नव्हते असे ममताचे म्हणणे होते. तिने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, चायना गेट या चित्रपटात मला घोड्यावर बसायचे होते. त्यासाठी त्याने मला मदत केली होती. पण त्याच्यात आणि माझ्यात काहीही नाते नव्हते. टिनूला मी खूप आवडत होती. मी त्याच्याशी लग्न केले नाही तर तो आत्महत्या करेन असेदेखील त्याने मला अनेकवेळा सांगितले होते. पण त्या दोघांचे अफेअर असल्याचे टिनूने अनेकवेळा म्हटले आहे. ममताचे त्याच्यासोबत अफेअर असताना तिचे दुसऱे अफेअर देखील सुरू असल्याचे देखील त्याने सांगितले होते. तसेच ममतामुळे त्याच्या पत्नीत आणि त्याच्यात अनेकवेळा भांडणे झाली अशी त्याने कबुली देखील दिली होती. 

tinu verma

Web Title: Mamta Kulkarni's Tinnu Verma was in the affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.