मल्लिका शेरावत एअर होस्टेस असताना पडली पायलटच्या प्रेमात, पुढे लग्नही केले; वाचा तिची प्रेमकथा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 21:49 IST2017-10-29T16:19:55+5:302017-10-29T21:49:55+5:30
मर्डर गर्ल मल्लिका शेरावतने करिना कपूर आणि तुषार कपूर स्टारर ‘जिना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारून ...

मल्लिका शेरावत एअर होस्टेस असताना पडली पायलटच्या प्रेमात, पुढे लग्नही केले; वाचा तिची प्रेमकथा!
म ्डर गर्ल मल्लिका शेरावतने करिना कपूर आणि तुषार कपूर स्टारर ‘जिना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मात्र तिला खरी ओळख २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ या चित्रपटाने मिळवून दिली. चित्रपटात तिने अभिनेता इमरान हाशमी याच्यासोबत जबरदस्त बोल्ड सीन दिले. २०१७ मध्ये ४१ वर्षांची झालेल्या झालेल्या मल्लिकाचा जन्म २४ आॅक्टोबर १९७६ रोजी हरियाणात झाला. मल्लिकाचे खरे नाव रिमा लाम्बा आहे. तुम्हाला माहिती आहे काय की, मल्लिकाचे लग्न वयाच्या १७व्या वर्षीच एका पायलटशी झाले होते? आज आम्ही याबाबतचा उलगडा करणार आहोत.
खरं तर मल्लिकाविषयी बºयाच अशा गोष्टी आहेत की ज्या कदाचित तुम्हाला माहिती असतील. सर्वांत अगोदर तिच्या नावाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मल्लिकाचे खरे नाव रिमा लाम्बा आहे. मात्र बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने तिचे नाव मल्लिका असे ठेवले. मात्र आईचे अडनाव शेरावत हे तिने कायम ठेवले. दुसरीबाब म्हणजे मल्लिकाच्या वडिलांचा तिने अभिनेत्री होण्यास विरोध होता. मात्र अशातही ती अभिनेत्री झाली. असे म्हटले जाते की, यामुळे बराच काळ मल्लिका आणि तिच्या वडिलांमध्ये अबोला होता. आता त्यांच्यातील संबंध चांगले आहेत.
मात्र यामध्ये सर्वांत धक्कादायक बाब ही आहे की, मल्लिका अगोदरच विवाहित आहे. मल्लिकाने कधीही ती विवाहित असल्याचे मान्य केले नाही. तिने नेहमीच स्वत:ला सिंगल असल्याचे म्हटले आहे. परंतु तिचे लग्न झाल्याचे काही पुरावे असल्याने ती विवाहित असावी अशीच चर्चा आहे. न्यूज वेबसाइट इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मल्लिका शेरावतने २००० या सालात करण सिंग गिल यांच्यासोबत विवाह केला होता. करण एक पायलट आहे. मल्लिकाची सासू म्हणविणाºया करणच्या आईने सांगितले होते की, मल्लिका एक एअर होस्टेस होती. तेव्हा तिला माझ्या मुलावर प्रेम जडले होते. पुढे त्यांनी लग्न केले. मल्लिका सुरुवातीपासूनच पैसा आणि नाव कमावू इच्छित होती. त्यामुळे तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिने माझ्या मुलाशी लग्नाच्या एक वर्षानंतरच घटस्फोटही घेतला.
![]()
तर मल्लिकाला जेव्हा तिने रिलेशन स्टेट्सबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने मी सिंगल असल्याचे म्हटले. मीडिया रिपोर्ट्सनुसार मल्लिकाने तिचे लग्न अन् एअर होस्टेस असल्याचा दावा सुरुवातीपासूनच खोडून काढला आहे. तिने सुरुवातीपासूनच हे म्हटले आहे की, तिचे लग्न झालेले नाही. परंतु काही पुराव्यांनुसार मल्लिका विवाहित असावी असेच दिसून येते.