​मल्याळम अभिनेता नीरज माधवने केले पारंपरिक पद्धतीने लग्न! लग्नाचे अप्रतिम फोटो पाहून विसराल डेस्टिनेशन वेडिंग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 11:17 IST2018-04-03T05:47:48+5:302018-04-03T11:17:48+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग ट्रेंडमध्ये असताना मल्याळम अभिनेता नीरज माधव याने मात्र  पारंपरिक लग्न केले.  सोमवारी कन्नूरच्या श्रीकंडापूरम येथे ...

Malayalam actor Neeraj Madhavan married in a traditional way! Visitor Destination Wedding After Seeing An Awesome Photos Of Marriage !! | ​मल्याळम अभिनेता नीरज माधवने केले पारंपरिक पद्धतीने लग्न! लग्नाचे अप्रतिम फोटो पाहून विसराल डेस्टिनेशन वेडिंग!!

​मल्याळम अभिनेता नीरज माधवने केले पारंपरिक पद्धतीने लग्न! लग्नाचे अप्रतिम फोटो पाहून विसराल डेस्टिनेशन वेडिंग!!

्या बॉलिवूडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग ट्रेंडमध्ये असताना मल्याळम अभिनेता नीरज माधव याने मात्र  पारंपरिक लग्न केले.  सोमवारी कन्नूरच्या श्रीकंडापूरम येथे नीरज लग्नाच्या बेडीत अडकला. गर्लफ्रेन्ड दीप्तीसोबत त्याने ‘वेली’या पारंपरिक पद्धतीने लग्न केले.





या लग्नाचे फोटो नीरजने फेसबुकवर शेअर केले आहेत. आता हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत, हे नव्याने सांगायला नकोच. या फोटोतील नीरज व दीप्तीचा अंदाज निश्चितपणे सुखावणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगपेक्षा हे पारंपरिक लग्न अधिक भावणारे आहे.





गत १६ मार्चला नीरज व दीप्ती यांचा साखरपुडा पार पडला होता. गत सोमवारी हे जोडपे लग्नबंधनात अडकले. यावेळी दीप्ती अतिशय सिंपल लूकमध्ये दिसली. पण या सिंपल लूकमध्येही ती अतिशय सुंदर दिसत होती.





गोल्डन जरीचे काठ असलेली पारंपरिक पांढरी साडी आणि अंगावर साजेसे अगदी मोजके दागिणे, असा दीप्तीचा अंदाज होता. तर नीरजने पांढरा मुंडू परिधान केला होता.





नीरज व दीप्ती दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. कोझिकोडच्या कारापरंबा येथे राहणारी दीप्ती पेशाने एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. टाटा कन्सल्टंसी सव्हिसेस, कोच्ची येथे ती इंजिनीअर आहे.





नीरजबद्दल सांगायचे तर फार कमी वेळात त्याने मल्याळम चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१३ मध्ये ‘बड्डी’ या चित्रपटाद्वारे त्याने मल्याळम चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. यात तो सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत होता. पण यानंतर नीरज अनेक चित्रपटांत लीड रोलमध्ये दिसला. यावर्षी मोहनलाल यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दृश्यम’मध्ये नीरज झळकला. त्यापूर्वी सप्तमश्री थस्कराहा, ओरू वदक्कन सेल्फी, ओरू मेक्सिकन अपारथा अशा अनेक चित्रपटांत नीरज दिसला. लवकरच नीरजचा ‘ममनकम’ हा चित्रपट रिलीज होतोय. यात तो सुपरस्टार ममूटीसोबत दिसणार आहे.

Web Title: Malayalam actor Neeraj Madhavan married in a traditional way! Visitor Destination Wedding After Seeing An Awesome Photos Of Marriage !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.