Video : मलायकाला भररस्त्यात रोखणारे ‘अंकल’ झाले ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘इनके इरादे....’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 19:29 IST2021-05-23T19:29:27+5:302021-05-23T19:29:52+5:30
होय, सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण मलायकाच्या वयाची खिल्ली उडवत आहेत.

Video : मलायकाला भररस्त्यात रोखणारे ‘अंकल’ झाले ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘इनके इरादे....’
मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या ‘सुपर डान्सर 4’ हा शो जज करतेय. काही आठवड्यांपूर्वीच तिने या शोमध्ये शिल्पा शेट्टीला रिप्लेस केले. साहजिकच मलायका चर्चेत आहे. पण यापेक्षाही अधिक सध्या तिच्या एका व्हिडीओची चर्चा रंगलीये.
होय, सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण मलायकाच्या वयाची खिल्ली उडवत आहेत. (Malaika Arora Video)
वूंपलाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओत मलायका नेहमीप्रमाणेच आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला निघाली आहे. यादरम्यान रस्त्यात तिला एक वृद्ध व्यक्ती थांबवतो आणि तिची स्तुती करु लागतो.
तू खुप फिट अँड फाईन आहेस. तुझे व्हिडीओ पाहून आम्हाला फिटनेसची प्रेरणा मिळते. अशीच तंदुरुस्त राहा ईश्वर सदा तुझ्यासोबत आहे. अशी प्रसंशा तो करतो. मलायका देखील अगदी विनम्र होत त्याचे आभार मानते आणि त्याचा निरोप घेते.
सध्या या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी यावरून मलायकाला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.
‘अंकल लाईन मार रहा है,’ ‘अंकल के इशारे कुछ ठीक नहीं लग रहें,’अशा कमेंट काही जणांनी केल्या आहेत. एका युजरने तर मलायका व त्या वृद्धाची ‘बिछडे हुए क्लासमेट’ म्हणून खिल्ली उडवली आहे.
मित्र वृद्ध झाला आणि मैत्रीण तरुणच राहिली, असे एका युजरने लिहिले आहे. या व्हिडीओला काही तासांत 4 लाखांवर लोकांनी पाहिला आहे.