मलायका अरोराने बेडरूममध्ये लावला अर्जुन कपूरसोबतचा खास फोटो, बघतच राहिले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:55 PM2022-03-08T18:55:34+5:302022-03-08T19:00:44+5:30

Malaika Arora : ४८ वय होऊनही मलायका आजही फीट दिसते आणि ती बाहेर पडली की तिला बघणारे थक्क होतात. मलायकाचा कोणताही फोटो पाहता पाहता व्हायरल होतो.

Malaika Arora shared bedroom photo fans sticks on special photo | मलायका अरोराने बेडरूममध्ये लावला अर्जुन कपूरसोबतचा खास फोटो, बघतच राहिले फॅन्स

मलायका अरोराने बेडरूममध्ये लावला अर्जुन कपूरसोबतचा खास फोटो, बघतच राहिले फॅन्स

googlenewsNext

मलायका  अरोरा (Malaika Arora) अलीकडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. मलायकाने तिच्या बेडरूममधील एक फोटो नुकताच इन्स्टा स्टोरीवर शेअर केला होता. यात फोटोत एक खास गोष्ट आहे. जी बघून तिचे फॅन्स खूश झाले असतील. बॉलिवूड अभिनेत्री, मॉडल, डान्सर मलायका अशा सेलिब्रिटींपैकी आहे जिचा अंदाज नेहमीच तिच्या फॅन्सना आवडत असतो.

४८ वय होऊनही मलायका आजही फीट दिसते आणि ती बाहेर पडली की तिला बघणारे थक्क होतात. मलायकाचा कोणताही फोटो पाहता पाहता व्हायरल होतो. तिचे फॅन्स तर तिची एक झलक बघण्यासाठी आतुर असतात. त्यांच्यासाठी ती तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच तिने एक खास फोटो शेअर केला. जो व्हायरल झाला आहे.

सर्वांनाच माहीत आहे की, मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्यासोबतचे फोटोही ती शेअर करत असते. अशात तिने एक खास फोटो शेअर केला. यावरून ती अर्जुनवर किती प्रेम करते हे दिसून येतं. मलायकाने बेडरूममधील एक फोटो शेअर केला असून त्यात मलायका आणि अर्जुनच्या फोटो फ्रेमवर सर्वांची नजर अटकली. दोघांचा एक सुंदर फोटो तिच्या बेडरूममध्ये आहे.

मलायका आणि अर्जुन या फ्रेममध्ये फारच कमाल दिसत आहेत. दोघांचा हा फोटो पाहून तेही तिच्या बेडरूम फॅन्स खूश झाले आहेत. ते कमेंट करून भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. फोटोवरून स्पष्ट दिसतं की, दोघे एकमेकांच्या किती प्रेमात आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपची अफवा पसरली होती. पण त्यानंतर दोघांनीही ते एकत्र असल्याचं सांगितलं होतं.
 

Web Title: Malaika Arora shared bedroom photo fans sticks on special photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.