काय सांगता? मलायका अरोरानं मालदीवमध्ये शोधली डायनोसोरची अंडी?  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 11:04 AM2021-12-05T11:04:30+5:302021-12-05T11:06:25+5:30

Malaika Arora in Maldives : होय, मलायकाने एक वेगळाच फोटो शेअर केला आहे आणि तो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.

Malaika Arora share dinosaur eggs photo from Maldives vacation with Arjun Kapoor | काय सांगता? मलायका अरोरानं मालदीवमध्ये शोधली डायनोसोरची अंडी?  

काय सांगता? मलायका अरोरानं मालदीवमध्ये शोधली डायनोसोरची अंडी?  

googlenewsNext

मलायका अरोरा ( Malaika Arora ) सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवतेय. बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरही ( Arjun Kapoo) तिच्यासोबत आहे. स्टार कपलचे मालदीवमधील एकापेक्षा एक सुंदर फोटो व व्हिडीओ व्हायरल होणारच. मलायकाच्या बिकिनी फोटोंनी आधीच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. याशिवाय तिचा सायकलिंगचा व्हिडीओही इंटरनेटवर धूम करतोय. आता मलायकाने एक वेगळाच फोटो शेअर केला आहे आणि तो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.
होय, मलायकाने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात तीन अंडीसदृश वस्तू दिसत आहेत. ही डायनोसोरची अंडी आहेत का? असा सवाल या फोटोसोबत मलायकाने विचारला आहे. 
आता मलायकानं शेअर केलेला हा फोटो कशाचा आहे हे तिलाच ठाऊक, पण तूर्तास तरी तिच्या या इन्स्टा स्टोरीची चांगलीच चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी मलायका व अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा होती. मात्र दोघांनीही मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत, या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केलं आहे. मलायकाचा मालदीवमध्ये सायकलिंग करतानाचा एक व्हिडीओही व्हायरल होतोय. 
वर्कफ्रॅन्टबाबत सांगायचं तर अर्जुन कपूर ‘भूत पोलीस’ सिनेमात दिसला होता. सिनेमात त्याने सैफ अली खान, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिससोबत काम केलं होतं. ही हॉरर-कॉमेडी काही लोकांना आवडली होती. आता अर्जुन ‘एक व्हिलन 2’मध्ये बिझी आहे. या सिनेमात तो जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटनीसोबत काम करताना दिसणार आहे. तर मलायका इंडियाज बेस्ट डान्सरची जज आहे.

Web Title: Malaika Arora share dinosaur eggs photo from Maldives vacation with Arjun Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.