​बहिणीइतकी गोरी नाही म्हणून मलायका अरोराला लोक मारायचे टोमणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 15:19 IST2017-03-27T09:49:01+5:302017-03-27T15:19:01+5:30

मलायका अरोरा कायम तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. पण कधीकाधी या मलायकाला ती सुंदर नाही, म्हणून टोमणे ...

Malaika Arora is killing people as not like a sister! | ​बहिणीइतकी गोरी नाही म्हणून मलायका अरोराला लोक मारायचे टोमणे!

​बहिणीइतकी गोरी नाही म्हणून मलायका अरोराला लोक मारायचे टोमणे!

ायका अरोरा कायम तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. पण कधीकाधी या मलायकाला ती सुंदर नाही, म्हणून टोमणे ऐकावे लागत. तिची कायम तिच्या बहीणीशी तुलना केली जात असे. होय, हे खरे आहे. एका ब्युटी प्रॉडक्टच्या लॉन्चिंगदरम्यान खुद्द मलायकाने याबद्दल सांगितले. मी ब्युटीला ब्रेनशी जोडते. चेहºयाच्या सौंदर्यापेक्षा मी बुद्धीचे सौंदर्य मी अधिक महत्त्वाचे मानते. लहानपणी मी माझ्या दिसण्यावरून बरेच टोमणे ऐकले आहेत. मी सुंदर नाही, असे मला लोक म्हणत. आपला देश रंगावरून सौंदर्य ठरवतो. माझी बहीण अमृता प्रचंड गोरी आहे. त्यामुळे आजुबाजूचे लोक कायम तिची अन् माझी तुलना करून मला कमी लेखायचे. मला चिडवायचे. यामुळे त्याकाळात बरीच दु:खी असायची. पण मी माझी बहीण आणि कुटुंबाचे आभार मानते की, त्यांनी कधीच मला  भेदभावपूर्ण वागणूक दिली नाही.  तुमच्यातील आत्मविश्वास हाच तुम्हाला सुंदर बनवतो,हेच माझ्या कुटुंबाने माझ्यावर बिंबवले, असे मलायका म्हणाली.

माझ्या सध्याच्या ग्लॅमरस लूकचे सगळे श्रेय माझी हेअर एक्सपर्ट आणि मेकअप आर्टिस्ट यांना जाते. मी त्यांची आभारी आहे, असेही मलायकाने नम्रपणे सांगितले. बॉलिवूडमध्ये कुण्या अभिनेत्रीत नॅचनल ब्युटी  दिसते? असे मलायकाला यावेळी विचारण्यात आले. यावेळी मलायकाने करिना कपूरचे नाव घेतले. ती म्हणाली,करिना माझी बहीण अमृताची बेस्ट फ्रेन्ड आहे. बेबो बॉलिवूडची सगळ्या नॅचरल ब्युटी आहे. मी करिनाला जवळून ओळखते. तिला मेकअप करणे जराही आवडत नाही. पण मेकअप न करताही ती कमालीची सुंदर दिसते. करिनाशिवाय माधुरी दीक्षित आणि दीपिका पादुकोण यांच्यातही एक नैसर्गिक सौंदर्य आहे, असे मला वाटते.

 

Web Title: Malaika Arora is killing people as not like a sister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.