Making of the Action : असे चित्रीत झालेत ‘काबील’मधील अॅक्शन सीन्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 11:42 IST2017-01-24T06:12:33+5:302017-01-24T11:42:33+5:30
एका अंधाच्या भूमिकेत शिरून अॅक्शन करणे साधे-सोपे काम नक्कीच नाहीच. पण रोहन भटनागर (‘काबील’मधील हृतिकने साकारलेली व्यक्तिरेखा) याचे अॅक्शन दृश्ये तोंडात बोट घालायला लावणारे आहे. ‘मेकिंग व्हिडिओ’पाहिल्यानंतर हृतिकच्या या अॅक्शनदृश्यांमागे किती मोठी मेहनत आहे, ते कळते.

Making of the Action : असे चित्रीत झालेत ‘काबील’मधील अॅक्शन सीन्स?
‘ ाबील’ रिलीज व्हायला आता अगदी काही दिवस उरले आहेत. निश्चितपणे हृतिकचे चाहते या चित्रपटाची आतूरतेने प्रतीक्षा करताहेत. ‘काबील’च्या टीमचा ‘मेकिंग आॅफ व्हिडिओ’ने प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. हा व्हिडिओ ‘मेकिंग आॅफ मुव्ही’चा नसून ‘मेकिंग आॅफ अॅक्शन इन दी मुव्ही’चा आहे. हृतिकने या चित्रपटात अंधाची भूमिका साकारली आहे, हे तुम्ही जाणताच. एका अंधाच्या भूमिकेत शिरून अॅक्शन करणे साधे-सोपे काम नक्कीच नाहीच. पण रोहन भटनागर (‘काबील’मधील हृतिकने साकारलेली व्यक्तिरेखा) याचे अॅक्शन दृश्ये तोंडात बोट घालायला लावणारे आहे. ‘मेकिंग व्हिडिओ’पाहिल्यानंतर हृतिकच्या या अॅक्शनदृश्यांमागे किती मोठी मेहनत आहे, ते कळते.
![]()
‘काबील’चे दिग्दर्शक संजय गुप्ता याबद्दल सांगतात, ‘काबील’मधील सर्व अॅक्शन दृश्ये अगदी विचारपूर्वक डिझाईन केली गेलीत. कुठलाही सुपरपॉवर नसलेली एक कॉमन व्यक्ति ही अॅक्शन दृश्ये करणार होती. शिवाय ही कॉमन व्यक्ति अंध होती. त्यामुळे हे लक्षात घेऊनच चित्रपटातील हृतिकची सगळी अॅक्शन दृश्ये डिझाईन केली गेली. ही अॅक्शन दृश्ये अधिकाधिक रिअॅलिस्टिक दिसतील, यावर आम्ही सर्वाधिक भर दिला. हृतिकने चित्रपटात रोहन भटनागरची भूमिका साकारली आहे. हा रोहन आपल्या मेंदूचा वापर करून शत्रूंशी लढतो आहे. त्याला बदला घ्यायचा आहे. पण आपल्यासोबत काय सुरु आहे आणि कुठून सुरु आहे, हे त्याला माहित नाही. अशास्थितीत पडद्यावरील या कॅरेक्टरच्या सगळ्या हालचाली फिल्मी न वाटता अगदी जिवंत वाटाव्यात, ही आमची धडपड होती. आमचे अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांनी यासाठी प्रचंड होमवर्क केले. त्यांच्या मेहनतीचे प्रतिबिंग ‘काबील’मध्ये तुम्ही पाहणार आहात.
या चित्रपटातील अॅक्शन दृश्यांसाठी हृतिकनेही बरीच मेहनत घेतली. विशेष म्हणजे कुठलीही तालिम न करता, हृतिकने ही सर्व अॅक्शन दृश्ये साकारलीत. हृतिक चित्रपटाच्या सेटवर यायचा आणि अॅक्शन डायरेक्टरने सांगितल्यानुसार, अॅक्शन सीन्स द्यायचा. हृतिकने ज्या चिकाटीने ही अॅक्शनदृश्ये केलीत. त्याला तोड नाही. कदाचित म्हणूनच आम्ही आमच्यातील १०० टक्के देऊ शकलो, असेही संजय गुप्ता म्हणाले.
हृतिक रोशन व यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘काबील’ येत्या २५ जानेवारीला रिलीज होतो आहे. आता ‘काबील’ पाहण्यास तुम्हीही आतूर झाले असाल. होय ना??
Related stories : 'काबिल'सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हृतिक रोशनची EX-Wife सुझैन खानने मुलांसह लावली हजेरी
Revealed : हृतिक रोशनचा पर्सनल मोबाईल नंबर हवायं?