​‘जॉली एलएलबी २’च्या निर्मात्यांची माघार; चार कटसह रिलीज होणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 19:31 IST2017-02-07T14:01:40+5:302017-02-07T19:31:40+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘जॉली एल.एल.बी. २’ हा चित्रपट आता चार कटसह प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील काही दृष्ये ...

The makers of Jolly LLB 2 retracted; Films to be released with four cuts | ​‘जॉली एलएलबी २’च्या निर्मात्यांची माघार; चार कटसह रिलीज होणार चित्रपट

​‘जॉली एलएलबी २’च्या निर्मात्यांची माघार; चार कटसह रिलीज होणार चित्रपट

लिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘जॉली एल.एल.बी. २’ हा चित्रपट आता चार कटसह प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील काही दृष्ये आक्षेपार्ह असल्याच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. चित्रपटातील चार दृष्ये कमी करण्यात यावीत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. निर्मात्यांनी नमते घेत या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद न मागण्याचे ठरविले आहे. 

‘जॉली एलएलबी २’चे निर्माते फॉक्स स्टुडिओज व निर्माता दिग्दर्शक सुभाष कपूर हे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र १० फेब्रुवारीला चित्रपट रिलीज करायचा असल्याने निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात हा वाद चिघळण्यापेक्षा यातील चार दृष्ये कापणे सोईस्कर समजले आहे. निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आपली याचिका मागे घेतली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार दृष्ये कापण्याचे ठरविले आहे.  



मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अजय कुमार वाघमारे यांनी चित्रपटाच्या नावातील ‘एलएलबी’ हा शब्द कमी करावा व या चित्रपटात असलेल्या काही दृष्यांना कमी करण्यात यावे अशा आशयाची याचिका दाखल केली होती. कोर्टात वकील पत्ते खेळतात व न्यायाधीशांच्या दिशेने खुर्ची फेकण्याची दृष्ये आक्षेपार्ह आहेत असा याचिकाकर्त्यांचा आरोप होता. यावर कोर्टाने तीन सदस्यीय समिती नेमून अहवाल द्यावा असे सांगितले होते. 

दरम्यान निर्मात्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीची बाजू स्पष्ट झाल्यावर यावर सुनावणी केली जाईल असे मत नोंदविले होते. समितीने ‘जॉली एलएलबी २’मधील काही दृष्ये भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा खराब करू शकतात असा अहवाल देत ही दृष्ये कमी करावी असा सल्ला दिला होता. न्यायालयाने तो कायम राखला. सेंसॉर बोर्ड देखील या चित्रपटाला दिलेली रेटिंग बदलवू शकतो असे सांगितले होते. 
या चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत असताना वाद आणखी चिघळला जाऊ नये असा विचार करीत निर्मात्यांनी कोर्टाच्या आदेशानुसार चार दृष्ये कापून ‘जॉली एलएलबी २’ प्रदर्शित करू असा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 


Web Title: The makers of Jolly LLB 2 retracted; Films to be released with four cuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.