​माहिरा सांगतेय : ‘रईस’च्या सेटवर शाहरूखने केले काय??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 19:47 IST2016-06-12T14:17:30+5:302016-06-12T19:47:30+5:30

‘रईस’च्या सेटवर शाहरूखचे वागणे अगदीच शॉकिंग होते. आपल्यासाठी नाही तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासाठी. ‘रईस’मध्ये शाहरूखसोबत माहिरा ही ...

Mahira tells you: What did SRK do on 'Rais' set ?? | ​माहिरा सांगतेय : ‘रईस’च्या सेटवर शाहरूखने केले काय??

​माहिरा सांगतेय : ‘रईस’च्या सेटवर शाहरूखने केले काय??

ईस’च्या सेटवर शाहरूखचे वागणे अगदीच शॉकिंग होते. आपल्यासाठी नाही तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासाठी. ‘रईस’मध्ये शाहरूखसोबत माहिरा ही सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच.  चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सेटवरील शाहरूखचे वागणे पाहून माहिराला धक्काच बसला. अहो, का म्हणजे काय?? कारण इतक्या निष्ठेने काम करणारा अभिनेता तिने याआधीच पाहिलाच नाही म्हणे...होय! पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत माहिराने शाहरूखची वारेमाप स्तूती केली. मी यापूर्वी इतकी मेहनत घेणारा अभिनेता पाहिलाच नाही. शाहरूखच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्याला विश्रांतीची गरज होती. पण तरिही तासन तास सेटवर उभे राहून शाहरूख काम करीत राहिला. काम पूर्ण करणे त्याची जबाबदारी होती आणि ती त्याने निभावली. कामाप्रति इतका एकनिष्ठ कलाकार मी प्रथमच पाहत होते, असे माहिराने यावेळी सांगितले. एकंदर शाहरूखची स्तूती करताना माहिरा जराही थकली नाही...तिचा हा व्हिडिओ बघाच, मग तुम्हालाही कळेल..

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Mahira tells you: What did SRK do on 'Rais' set ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.