​‘दंगल’च्या मानधनातून महावीर सिंग फोगट यांनी विकत घेतल्या म्हशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 22:36 IST2017-01-28T17:06:03+5:302017-01-28T22:36:03+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या दंगल या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘दंगल’ हा चित्रपट पहेलवान ...

Mahaveer Singh Phogat buys buffalo from 'Dangal' | ​‘दंगल’च्या मानधनातून महावीर सिंग फोगट यांनी विकत घेतल्या म्हशी!

​‘दंगल’च्या मानधनातून महावीर सिंग फोगट यांनी विकत घेतल्या म्हशी!

लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या दंगल या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘दंगल’ हा चित्रपट पहेलवान महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. महावीर सिंग फोगट यांनी ‘दंगल’च्या मानधनातून म्हशी विकत घेतल्याची सध्या चर्चा सुरू आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार आमिर खान अभिनित ‘दंगल’ या चित्रपटाच्या रॉयल्टीपोटी महावीर सिंग फोगट यांना ८० लाख रुपये देण्यात आले होते. यातील काही रकमेच्या त्यांनी हायब्रिड म्हशी विकत घेतल्याची सध्या चर्चा सुरू आहे. दंगल या चित्रपटाने बॉक्स आफिसवर ३५० कोटीहून अधिकची कमाई करीत नवा विक्रम केला आहे. या चित्रपटासाठी आमिर खान प्रोडक्शनने महावीर सिंग फोगट यांच्याकडून ‘दंगल’चे अधिकार विकत घेतले होते. फोगट यांना मिळालेल्या राशीचा त्यांनी खुलासा केला नसून त्यांनी आपण समाधानी असल्याचे सांगितले आहे. 



महावीर सिंग यांच्या मुली पहेलवान असल्याने त्यांच्या दैनंदिन आहारात शाकाहार व उच्च प्रोटीन असलेल्या वस्तूंचा समावेश असतो याचमुळे त्यांनी दुधासाठी उच्च प्रजातीच्या म्हशी विकत घेतल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. फोगट सिस्टर्स गीता, बबीता, संगीता व रितू राष्ट्रीय स्तरावरील पहेलवान आहेत. सध्या महावीर सिंग यांची सर्वांत लहान मुलगी रिली प्रो रेसलिंग लीग या स्पर्धेत सहभागी झाली आहे, मात्र दंगलच्या रिलीजनंतर तिच्या जीवनात बदल झाला असल्याचे मत तिने व्यक्त केले. 

रितूला चित्रपटासाठी प्रस्ताव येत असल्याचे तिने सांगितले आहे, मात्र मी आपले संपूर्ण लक्ष कुश्तीवर केंद्रित केले असून यापलिकडे मला काहीच दिसत नाही असे तिने सांगितले आहे. ‘दंगल’च्या प्रदर्शनानंतर प्रो रेसलिंग लीगमध्ये सर्वाधिक बोली लावण्यात आलेली ती खेळाडू ठरली आहे. तिला एका सिजनसाठी तब्बल ३६ लाख रुपये मानधन मिळाले आहे.  

Web Title: Mahaveer Singh Phogat buys buffalo from 'Dangal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.