भंसाळीचा नाही बनवणार ‘मगधीरा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:03 IST2016-04-30T18:26:47+5:302016-05-01T00:03:39+5:30
‘बाजीराव मस्तानी’च्या तुफान यशानंतर संजय लीला भंसाळी आता कोणता चित्रपट बनवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले. पुढील वर्षी नाताळाच्या आठवड्यात ...

भंसाळीचा नाही बनवणार ‘मगधीरा’
‘ ाजीराव मस्तानी’च्या तुफान यशानंतर संजय लीला भंसाळी आता कोणता चित्रपट बनवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले. पुढील वर्षी नाताळाच्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे त्यांनी स्वत: घोषित केले.
मग अशी बातमी आली की, ‘बाहूबली’ फेम दिग्दर्शक राजमौली यांच्या ‘मगधीरा’ चित्रपटाचा रिमेक भंसाळी बनवणार आहेत. परंतु खुद्द भंसाळींनी याला नकार दिला आहे.
त्यांच्या प्रवक्त्याने जाहीर केले की, ‘संजय भंसाळी ‘मगधीरा’चा रिमेक तयार करणार नाही. अशा आशयाच्या सर्व अफवा आहेत. मुळात भंसाळी कोणत्याच चित्रपटाचा रिमेक बनवत नाही आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल अधिक माहिती लवकरच देण्यात येईल.’ स्वत: भंसाळी यांनी पुढील वर्षी नाताळाच्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे घोषित केले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनवणे तसे हिंदीमध्ये नवे नाही. साऊथमध्ये हीट झालेली कथा नव्या स्वरुपात किंवा जशास तशी हिंदी प्रेक्षकांना दाखवण्याचा मोह अक्षयकुमार, सलमानपासून परफेक्शनिस्ट आमिर खानलाही सुटलेला नाही.
नावाजलेले दिग्दर्शकसुद्धा असे आयते ‘मटेरिअल’ घेऊन स्वत:च्या नावाचा ऊधोऊधो करताना दिसतात. मात्र भंसाळींनी अशा दिग्दर्शकांचया पंक्तीत बसायचे दिसत नाहिए.