​ ‘या’ क्रिकेडपटूसाठी वेडी होती माधुरी दीक्षित!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 09:47 AM2017-07-26T09:47:33+5:302017-07-26T17:47:07+5:30

बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते फार जुने आहे. अगदी ताजे उदहारण द्यायचे झाल्यास अनुष्का शर्मा व विराट कोहलीचे देता येईल. ...

Madhuri Dixit was crazy for 'this' cricketer | ​ ‘या’ क्रिकेडपटूसाठी वेडी होती माधुरी दीक्षित!!

​ ‘या’ क्रिकेडपटूसाठी वेडी होती माधुरी दीक्षित!!

googlenewsNext
लिवूड आणि क्रिकेटचे नाते फार जुने आहे. अगदी ताजे उदहारण द्यायचे झाल्यास अनुष्का शर्मा व विराट कोहलीचे देता येईल. अनुष्का व विराट सध्या सगळ्यांत चर्चीत कपल आहे. आता हेच कनेक्शन घेऊन थोडे मागे जावूयात. बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते बरेच जुने आहे, हेच तुम्हाला जाणवेल. होय, बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित एकेकाळी एका क्रिकेटपटूच्या आकंठ प्रेमात होती. अर्थात एकतर्फी हं. होय, खुद्द माधुरीने एका मुलाखतीत ही कबुली दिली होती.



भारताचा सर्वाधिक महान ‘ओपनिंग बॅट्समॅन’ सुनील गावस्कर यांच्यासाठी माधुरी जणू वेडी होती. हो, अक्षरश: वेडी. हे आमचे नाही तर माधुरीचे शब्द आहेत.‘ मी सुनील गावस्कर यांच्यासाठी अक्षरश: वेडे आहे. मला तो कमालीचा सेक्सी वाटतो. माझ्या स्वप्नात तो येतो. मी वेड्यागत त्याला फॉलो करते,असे माधुरीने या मुलाखतीत सांगितले होते. ही मुलाखत दिली त्यावेळी माधुरी २५ वर्षांची होती आणि गावस्कर ४३ वर्षांचे. (सुनील गावस्कर यांनी त्यावेळी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. )अर्थात तरिही त्यांचा चार्म कायम होता. पण प्रेम आणि वयाचा संबंध येतोच कुठे?  सुनील गावस्कर आणि माधुरीच्या वयात १८ वर्षांचे अंतर होते, पण माधुरीला याने जराही फरक पडत नव्हता.  अर्थात या भावना माधुरीने सुनील गावस्करांपर्यंत पोहोचवल्यात की नाहीत आणि पोहोचवल्या नसतील तर का? याचे उत्तर आम्हाला ठाऊक नाही.
माधुरीचे फिल्मी करिअर जोरात असताना तिचे नाव अनेकांशी जोडले गेले. अगदी अनिल कपूरपासून संजय दत्तपर्यंत. अनिल व माधुरी या दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलेयं. या दोघांची आॅनस्क्रीन जोडी लोकांना प्रचंड भावली होती. त्याचसोबत त्यांच्या नात्याची चर्चाही झाली होती. संजय दत्तसोबतचा तिचा लव्ह एपिसोडही खूप गाजला होता.
 

Web Title: Madhuri Dixit was crazy for 'this' cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.