माधुरी दीक्षितने 'मेहंदी' गाण्यावर केला गरबा, धकधक गर्लच्या डान्सवर फिदा झाले चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:04 IST2021-10-08T13:04:12+5:302021-10-08T13:04:36+5:30
अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे.

माधुरी दीक्षितने 'मेहंदी' गाण्यावर केला गरबा, धकधक गर्लच्या डान्सवर फिदा झाले चाहते
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर चर्चेत येत असते. तिला आजही चाहते धक धक गर्ल या नावाने ओळखली जाते. यासोबतच तिला बॉलिवूडची डान्सिंग क्वीन असेही संबोधले जाते. माधुरी नव्वदच्या दशकातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अदांवर लाखो चाहते फिदा होताना दिसतात. आजही तिचा जलवा कायम आहे.
सध्या धकधक गर्ल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना भुरळ पाडताना दिसत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मेहंदी गाण्यावर गरबा करताना दिसते आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ई हेलो! चलो गरबा रामवा, माझ्या सोबत जोडलेले आणि आपल्या घरी आरामात माझ्या व्हिडीओचा रिमिक्स रिल बनवा. चाहत्यांवर गरब्याचा रंग चढताना दिसतो आहे आणि ते माधुरीला साथ देण्यासाठी तयार आहेत. एका चाहत्याने लिहिले की फॅब्युलस. तर एका युजरने लिहिले की अमेजिंग.
माधुरी दीक्षित सध्या डान्स दीवाने शोचे परीक्षण करते आहे. शोच्या सेटवरील तिचे कित्येक डान्स व्हिडीओ दररोज व्हायरल होताना दिसत आहे. माधुरी दीक्षित शेवटची कलंक आणि टोटल धमाल या चित्रपटात झळकली आहे.