​मधूर भांडारकरच्या ‘मुंबई मिस्ट’चे पोस्टर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 11:12 IST2017-06-21T05:40:52+5:302017-06-21T11:12:19+5:30

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्या ‘मुंबई मिस्ट’ या शॉर्ट फिल्मचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले. ‘मुंबई मिस्ट’ ...

Madhur Bhandarkar's 'Mumbai Mist' poster out! | ​मधूर भांडारकरच्या ‘मुंबई मिस्ट’चे पोस्टर आऊट!

​मधूर भांडारकरच्या ‘मुंबई मिस्ट’चे पोस्टर आऊट!


/>राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्या ‘मुंबई मिस्ट’ या शॉर्ट फिल्मचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले. ‘मुंबई मिस्ट’ ही शॉर्ट फिल्म एका उच्च मध्यमवर्गीय इसमाची कथा आहे. एक ११ वर्षांचा कचरा गोळा करणारा मुलगा त्याच्या आयुष्यात येतो आणि या माणसाचे आयुष्यच बदलून जाते. या माणसाची त्या मुलाशी चांलीच गट्टी जमते. या आगळ्यावेगळ्या मैत्रीवर या शॉर्ट फिल्मची कथा आधारलेली आहे. १८ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये अनू कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर ११ वर्षांच्या कचरा वेचणाºया मुलाची भूमिका देवर्थ मुग्दल याने साकारली आहे. मधूर भांडारकर यांच्या शब्दांत सांगायचे तर ही एक प्रेमळ आणि भावूक कथा आहे. संजय चेल आणि प्रियांका घातक लिखित ही शॉर्ट फिल्म तुम्हाला एकाचवेळी हसायला आणि रडायला भाग पाडले. पाच दिवसांत या शॉर्ट फिल्मचे शूटींग पार पडले.



मधूर भांडारकर हा ‘आवारा हूं’ या राजकपूर यांच्या गाण्यांचा खूप मोठा चाहता आहे. याच कारणामुळे ‘मुंबई मिस्ट’च्या एका महत्त्वपूर्ण सीनच्या बॅकग्राऊंडला हे गाणे ऐकायला मिळणार आहे.
यंदा चीनमध्ये होणाºया ‘ब्रिक्स फिल्म फेस्टिवल’मध्ये मधूर भांडारकर ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित करणार आहेत. या फेस्टिवलमध्ये पाच देशांचे फिल्ममेकर्स आपली शॉर्ट फिल्म प्रदर्शित करणार आहेत. मधूर भांडारकर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी ‘वेयर हॅज दी टाईम गॉन’ अशी या फेस्टिवलची थीम आहे. एकाच थीमवरच्या या पाच शॉर्ट फिल्म्स एकत्रित करून एक चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. चीनमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर होणार आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये हा चित्रपट चीनमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Madhur Bhandarkar's 'Mumbai Mist' poster out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.