तर हा अभिनेता ठरला कॅटरिना कैफसाठी लकी चार्म ! वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 06:12 AM2017-10-04T06:12:06+5:302017-10-04T11:43:30+5:30

कॅटरिना कैफचा जग्गा जासूस चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकलेला नाही. चित्रपट फ्लॉप होऊन ही कॅटरिनाचे स्टार ...

Lucky charm for Katrina Kaif! You'll be surprised by reading | तर हा अभिनेता ठरला कॅटरिना कैफसाठी लकी चार्म ! वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

तर हा अभिनेता ठरला कॅटरिना कैफसाठी लकी चार्म ! वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

googlenewsNext
टरिना कैफचा जग्गा जासूस चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकलेला नाही. चित्रपट फ्लॉप होऊन ही कॅटरिनाचे स्टार मात्र चांगले आहेत. सलमान सोबत ती टायगर जिंदा है चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान आणि कॅटची जोडी पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर आहेत. तसेच सलमान कॅटरिनासाठी लकी चार्म ठरतो आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण टायगर जिंदा है चित्रपट साईन करताच आणखीन दोन मोठे चित्रपट तिच्या हाती लागले आहेत. होय, तुम्ही बरोबर वाचलात 'टायगर जिंदा है'नंतर कॅटरिना आमीर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कॅटरिनाने रणवीर सिंगसोबत सुद्धा चित्रपट साईन केला आहे. रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 83साठी कॅटरिना कैफला साईन केले जाऊ शकते.  
 
'83' हा चित्रपट 1983च्या वर्ल्ड कपवर तयार करण्यात येतो आहे. याचित्रपटात रणवीर सिंग भारत क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे.  चित्रपटात कॅटरिना कैफ कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 साली पहिला वर्ल्ड कप जिंकला होता आणि संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार दोन अभिनेत्रींना या चित्रपटात घेण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. कबीर खानने दिग्दर्शित केलेला ट्यूबलाइट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता.  

ALSO READ :   ​कॅटरिना कैफने चार महिन्यांत केला ‘हा’ कारनामा! ऐकून दीपिका, आलियालाही बसेल धक्का!!

रणवीर सिंगचा पद्मावती चित्रपटातील लूक दोन दिवस आधी रिलीज करण्यात आला आहे. यात त्याच्या चेह-यावर मोठ्या जखमेचा एक व्रण होता. पद्मावतीमध्ये तो सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंगसह यात दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांची भूमिका आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानंतर तो जोया अख्तरच्या गुल्ली बॉयमध्ये सुद्धा दिसणार आहे.  

Web Title: Lucky charm for Katrina Kaif! You'll be surprised by reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.