या हिरोमुळे क्रितीने सोडला ‘लखनौ सेंट्रल’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:03 IST2016-12-13T17:03:32+5:302016-12-13T17:03:32+5:30
रंजीत तिवारीच्या ‘लखनौ सेंट्रल’या आगामी चित्रपटामुळे अभिनेत्री क्रिती सॅनन चर्चेत आली होती. यानंतर एक वेगळीच बातमी ऐकायला आली. ती ...

या हिरोमुळे क्रितीने सोडला ‘लखनौ सेंट्रल’?
र जीत तिवारीच्या ‘लखनौ सेंट्रल’या आगामी चित्रपटामुळे अभिनेत्री क्रिती सॅनन चर्चेत आली होती. यानंतर एक वेगळीच बातमी ऐकायला आली. ती म्हणजे, ‘मिर्झिया’ फेम सैयामी खेर हिने क्रितीला रिप्लेस केल्याची. डेट्समुळे क्रितीने हा चित्रपट सोडला आणि तिच्या जागी सैयामीची वर्णी लागली, असे कारण यावेळी सांगितले गेले होते. पण मीडियातील बातमी खरी मानाल तर हा चित्रपट सोडण्यामागे डेट्स हे कारण नाही तर एक वेगळेच कारण आहे. हे कारण आहे, अभिनेता फरहान अख्तर. होय, फरहान अख्तरमुळे क्रितीने ‘लखनौ सेंट्रल’ सोडल्याची खबर आहे. फरहान या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. क्रिती फरहानसोबत काम करू इच्छित नव्हती. त्यामुळे तिने हा चित्रपट सोडल्याचे कळतेय.
![]()
अर्थात असे काहीही नसल्याचे क्रिती सांगते आहे. फरहानमुळे हा चित्रपट मी सोडला, असे अजिबात नाही. ऊलट मी हा चित्रपट करण्यास प्रचंड उत्सूक होते. कारण त्याची स्क्रीप्ट मला आवडली होती. पण दुर्दैवाने चित्रपटाचे शूटींग शेड्यूल बदलले गेले आणि मला हा सिनेमा सोडावा लागला. आधी केलेल्या कमिटमेंटमुळे हा चित्रपट सोडण्याशिवाय माझ्यापुढे कुठलाही पर्याय उरला नव्हता, असे क्रिती म्हणाली.
केवळ एवढेच नाही तर फरहानसोबत काम करायला मला आवडेल, असेही तिने स्पष्ट केले. आता फरहानमुळे चित्रपट सोडला हे मानायला क्रिती तयार नाही. पण सूत्रांनुसार, हेच कारण आहे. फरहानचा अलीकडे आलेला ‘रॉक आॅन2’ बॉक्सआॅफिसवर आपटला. यामुळे फरहानसोबत स्क्रीन शेअर करायला क्रिती उत्सूक नाही. एकंदर काय तर अपयश वाट्याला येईल, असे काहीही क्रितीला करायचे नाही.