प्रीतीची मीडियावर भडास...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:40 IST2016-02-10T07:10:41+5:302016-02-10T12:40:41+5:30
प्रीती झिंटा आणि उद्योगपती नेस वाडिया यांच्यामध्ये खूप वर्षे मैत्री होती. पण त्याचे नात्यामध्ये रुपांतर होऊ शकले नाही. दरम्यान ...

प्रीतीची मीडियावर भडास...
प्रीती झिंटा या ‘व्हॅलेंटाईन डे’ला आपला मित्र जीन गुडइनफसोबत विवाहबद्ध होणार असल्याच्या या बातमीमुळे तिचा पारा तापला आहे. यातच रागाने फणफणलेल्या प्रीतीने वृत्तपत्र बंद करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्यापेक्षा 10 वर्षे लहान असलेल्या व्यक्तीशी प्रीती लग्न करीत असल्याची ही बातमी होती.
ही बातमी वाचून प्रीती भडकली. त्यानंतर तिने ट्विटरवरुन खºया बातम्या छापता येत नसेल तर न्यूज पेपर बंद करा असे ट्विट केले आहे. आपल्या लग्नाची गोष्ट लोकांना आपण सांगेन. मीडियाने यात हस्तक्षेप करायची गरज काय असे प्रीतीचे म्हणणे आहे. मीडियाने रचलेल्या बातम्या देऊ नये असा सल्लाही तिने दिला आहे.
cnxoldfiles/span>ने ही गोष्ट मान्य केलेली नाही.