दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या बंगल्यात झाली 1 लाखाची चोरी,चोरांना पकडण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 11:15 IST2017-05-08T13:10:15+5:302017-05-09T11:15:35+5:30
बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री नूतन यांचा मुंब्रा येथील बंगल्यात चोरी झाल्याची घटना घडली आहे.बंगल्याच्या काचा फोडत काही चोरांनी बंगल्यात प्रवेश ...
(1).jpg)
दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या बंगल्यात झाली 1 लाखाची चोरी,चोरांना पकडण्यात पोलिसांना यश
ब लिवूड दिवंगत अभिनेत्री नूतन यांचा मुंब्रा येथील बंगल्यात चोरी झाल्याची घटना घडली आहे.बंगल्याच्या काचा फोडत काही चोरांनी बंगल्यात प्रवेश केला होता. या बंगल्यात असलेल्या चांदीच्या बांगड्या, मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तूसह जवळपास 1 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी पळवला होता.बंगल्यासाठी ठेवण्यात आलेल्या सिक्युरीटी गार्डने या चोरांना अडवण्याचा प्रयत्न करताच या चोरांनी सिक्युरीटी गार्डवरच दगडांनी हल्ला चढवला. बंगल्यात घुसल्यानंतर त्यांनी सर्व सामान गोळा करत तेथून पळ काढला. घटनेनंतर सिक्यरीटी गार्डनेच पोलिसांना कळवले,पोलिसांनी शोधाशोध सुरु केली. बंगल्यात चोरी करणारे हे चोर कलवा येथील झोपडपट्टीतलेच रहिवासी असल्याचे शोधतपासात उघड झाले. पोलिसांनी तेथून या सर्वांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी केल्यानंतर या सर्वांनी गुन्हा कबूल केला आहे.केवळ दारु आणि नशेसाठी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
1991 साली नूतन यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड सोडले तर या बंगल्यावर कोणीच राहत नाहीत.नूतन यांचा मुलगा आणि अभिनेता मोहनीश बहलचा या बंगल्यावर वारसा हक्क असल्याचे माहिती मिळतेय.
1991 साली नूतन यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड सोडले तर या बंगल्यावर कोणीच राहत नाहीत.नूतन यांचा मुलगा आणि अभिनेता मोहनीश बहलचा या बंगल्यावर वारसा हक्क असल्याचे माहिती मिळतेय.