पाहा, ‘बाबूमोशाय बंदूकबाज’मधील नवाजुद्दीन सिद्दीकीचा अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 14:38 IST2017-03-29T09:08:59+5:302017-03-29T14:38:59+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक नवा सिनेमा येतो आहे. या सिनेमाचे नाव आहे, ‘बाबूमोशाय बंदूकबाज’. या चित्रपटाचे नवे पोस्टर आज रिलीज ...

पाहा, ‘बाबूमोशाय बंदूकबाज’मधील नवाजुद्दीन सिद्दीकीचा अंदाज!
न ाजुद्दीन सिद्दीकीचा एक नवा सिनेमा येतो आहे. या सिनेमाचे नाव आहे, ‘बाबूमोशाय बंदूकबाज’. या चित्रपटाचे नवे पोस्टर आज रिलीज करण्यात आले. या पोस्टरमध्ये नवाज बनियान आणि लुंगी अशा भन्नाट अवतारात दिसतो आहे. त्याच्या डाव्या खांद्यावर एक ट्रांझिस्टर लटकवलेला आहे तर उजव्या हातात एक लहानशी बकेट आहे. पण या पोस्टरचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, नवाजने कमरेमागे लपवलेली बंदूक़ यावरून चित्रपटाचा अंदाज तुम्ही लावू शकता.
{{{{twitter_post_id####
नवाजचा हा चित्रपट कुशान नंदी दिग्दर्शित करतोय.‘हमदम’,‘युद्ध’सारखे चित्रपट कुशान नंदी यांनी दिग्दर्शित केले आहे. अलीकडे या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्याची खबर आली. होय, याचे कारण म्हणजे, हिरोईन. चित्रपटात एक आयटम साँग आहे. या आयटम साँगसाठी हिरोईन मिळत नसल्यामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. अद्यापही हिरोईनचा हा शोध संपलेला नाही. त्यामुळेच आता हा चित्रपट येत्या मे महिन्यात रिलीज होणार आहे.
‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाची घोषणा झाली, त्यावेळी यात नवाजुद्दीनच्या अपोझिट चित्रांगदा दिसणार असे, जाहिर करण्यात आले होते. पण अचानक माशी शिंकली. दिग्दर्शकासोबत वाद झाल्याने चित्रांगदाने या चित्रपटातून अंग काढून घेतले. त्यामुळे चित्रपट लांबला. इतके कमी की काय, म्हणून काही आर्थिक अडचणीही चित्रपटाच्या मार्गात येऊन उभ्या राहिल्या तेव्हापासून मेकर्र्सला नव-नव्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पण शेवटी जिद्द आहे, तिथे यशही आहे. चित्रपटाचे ताजे पोस्टर याचाच परिपाक म्हणायला हवा. त्यामुळे नवाजचा हा आगळावेगळा सिनेमा लवकरच आपल्याला पाहायला मिळेल, अशी अपेक्षा करूया!
{{{{twitter_post_id####
}}}}Nawazuddin Siddiqui is #BabumoshaiBandookbaaz... Directed by Kushan Nandy... Here's the teaser poster: pic.twitter.com/Ed0b2ZiRzA— taran adarsh (@taran_adarsh) 29 March 2017