पाहा, ‘सुल्तान’ की जान अनुष्का शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 16:58 IST2016-05-01T11:25:17+5:302016-05-01T16:58:03+5:30
‘सुल्तान’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा दुसरा टिझर रिलीज झाला. आज अनुष्काचा (१मे) वाढदिवस. नेमक्या याच दिवशी अनुष्काने ‘सुल्तान’च्या टिझरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आगळीवेगळी भेट दिली आहे.

पाहा, ‘सुल्तान’ की जान अनुष्का शर्मा
‘ स देश की जान ना, इस देश की लडकी है...’ अनुष्काच्या या वाक्यावर हमखास टाळ्या पडणार...‘सुल्तान’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा दुसरा टिझर आज रविवारी रिलीज झाला. आज अनुष्काचा (१मे) वाढदिवस. नेमक्या याच दिवशी अनुष्काने ‘सुल्तान’च्या टिझरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आगळीवेगळी भेट दिली आहे. या टिझरमध्ये पहेलवानाच्या भूमिकेतील अनुष्काला पाहणे निश्चितपणे रोमांचकारी आहे. दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी या सेकंड टिझरमध्ये अनुष्काला फोकस केले आहे. सलमान खानने या टिझरला आवाज दिला आहे. तेव्हा तुम्ही हा टिझर बघायला हवाच...