​पाहा, ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 11:53 IST2017-02-28T06:23:02+5:302017-02-28T11:53:02+5:30

अभिनेत्री अक्षरा हासन, विवान शाह आणि गुरमीत चौधरी स्टारस ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ या चित्रपटाची बरीच चर्चा होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आला. ट्रेलर बघता, या चित्रपटात विनोदाची भरमार असणार, असे दिसतेय. याशिवाय चित्रपटातून एक गंभीर संदेश देण्याचा प्रयत्नही दिसतोय.

Look, 'Ladly's Wedding Laddu Deewana' trailer! | ​पाहा, ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’चा ट्रेलर!

​पाहा, ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’चा ट्रेलर!

िनेत्री अक्षरा हासन, विवान शाह आणि गुरमीत चौधरी स्टारस ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ या चित्रपटाची बरीच चर्चा होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आला. ट्रेलर बघता, या चित्रपटात विनोदाची भरमार असणार, असे दिसतेय. याशिवाय चित्रपटातून एक गंभीर संदेश देण्याचा प्रयत्नही दिसतोय. या चित्रपटात अक्षरा एका मॉडर्न शहरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती यात लीला नावाच्या मुलीची भूमिका साकारतेय. याऊलट विवाह शाह एका लहानच्या गावातील मुलाच्या अर्थात लड्डूच्या भूमिकेत आहे. तर गुरमीत वीर नामक व्यक्तिरेखा साकारतो आहे. वीर हा एक राजकुमार आहे. २ मिनिटे ५७ सेकंदाच्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा एक फुल्ल टू कॉमेडी चित्रपट असल्याचे भासते. पण विनोदा विनोदात हा चित्रपट एक गंभीर संदेश देण्याचा प्रयत्न करतो. काही तासांत सुमारे १५ हजार लोकांनी चित्रपटाचे ट्रेलर बघितले. एंकदर काय तर ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलायं. आता चित्रपटाला किती प्रतिसाद देतात, ते लवकरच बघू...तोपर्यंत तुम्ही ट्रेलर पाहायलाच हवे...



‘जॉली एलएलएलबी2’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा सौरभ शुक्ला ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सौरभ शुक्ला यांच्याशिवाय, कविता वर्मा, किशोरी शहाणे, दर्शन परिहार, एहसान खान आणि मुनीष सप्पेल यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मनीष हरिशंकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विपीन पटवा, अर्को, रेवंत सिद्धार्थ आणि मालिनी अवस्थी यांनी या चित्रपटास संगीत दिले आहे.  
 

Web Title: Look, 'Ladly's Wedding Laddu Deewana' trailer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.