लांब केस, वाढलेली दाढी... बदललेल्या लूकमधील या अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 11:39 AM2023-02-09T11:39:07+5:302023-02-09T11:39:30+5:30

साऊथच्या या सुपरस्टारचा लेटेस्ट फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Long hair, growing beard... It is difficult to recognize this actor in his changed look | लांब केस, वाढलेली दाढी... बदललेल्या लूकमधील या अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

लांब केस, वाढलेली दाढी... बदललेल्या लूकमधील या अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

googlenewsNext

साऊथच्या सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांमध्ये अभिनेता धनुष(Dhanush)च्या नावाचादेखील समावेश आहे. आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. धनुषने फक्त साऊथमध्येच नाही तर हिंदी चित्रपट रांझणामधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. दरम्यान आता धनुषचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोत त्याला ओळखणं कठीण झाले आहे.

 दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये धनुषचा लूक पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे. वास्तविक, फोटोमध्ये धनुष लांब केस आणि वाढलेल्या दाढीमध्ये दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्याचे हे फोटो पाहून सर्व हैराण झाले आहेत आणि धनुषला कोणीही सहज ओळखू शकत नाही.


धनुषने लेटेस्ट फोटो शेअर करत लिहिले की, वाथी प्रमोशन स्टाइल, माझी आवडती हेअर स्टाइल. धनुष अभिनीत 'वाथी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या धनुष व्यस्त आहे. पण धनुषच्या या नव्या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. धनुषच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत.


धनुषचे चाहते त्याच्या आगामी 'वाथी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'वाथी' १७ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. याआधी गेल्या वर्षी जुलै महिन्यात धनुषच्या 'वाथी'चा शानदार टीझर रिलीज झाला होता, तेव्हापासून चाहते वाथीसाठी उत्सुक आहेत.

Web Title: Long hair, growing beard... It is difficult to recognize this actor in his changed look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhanushधनुष