Lokmat Most Stylish Awards 2019 : गौरव होणार महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 08:16 PM2019-12-16T20:16:28+5:302019-12-16T20:17:15+5:30

Lokmat Most Stylish Awards : महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने स्टायलिश पैलूंना हेरून अशा हटके पर्सनॅलिटीजना समाजासमोर आणायचे ठरविले आहे.

Lokmat Most Stylish Awards 2019: Maharashtra's most stylish celebrities will be honored | Lokmat Most Stylish Awards 2019 : गौरव होणार महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा

Lokmat Most Stylish Awards 2019 : गौरव होणार महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा

googlenewsNext

 महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक लोकमतने स्टायलिश पैलूंना हेरण्याचे ठरवले आहे. यासाठी लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. येत्या १८ डिसेंबरला हा सोहळा रंगणार आहे.


मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. मराठी मातीत स्टाइलच्या प्रतिमेला पुरस्काराचे कोंदण देण्याच्या अभिनव कल्पनेने उभा महाराष्ट्र मोहरून गेला आहे.

आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश व्यक्तीमत्त्वांना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याला गुलशन ग्रोव्हर, हिमेश रेशमिया, सतीश कौशिक, आयुषमान खुराना, तापसी पन्नू, किशोरी शहाणे, सचिन पिळगावकर यासारख्या हिंदी व मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रेटींची उपस्थिती लाभणार आहे.

या सेलिब्रिटींच्या फॅशन स्टाईल, फॅशन स्टेटमेंटकडे आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
 

Web Title: Lokmat Most Stylish Awards 2019: Maharashtra's most stylish celebrities will be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.