Lokmat Most Stylish Awards 2019: 'बाला'चा कल्ला; 'आयकॉन ऑफ द इअर' ठरला आयुषमान खुराणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 11:30 PM2019-12-18T23:30:16+5:302019-12-18T23:30:21+5:30

विविध धाटणीच्या भूमिका सहजसुंदरपणे साकारणाऱ्या आयुष्यमानचा गौरव

Lokmat Most Stylish Awards 2019 Ayushmann Khurrana wins Icon of the Year award | Lokmat Most Stylish Awards 2019: 'बाला'चा कल्ला; 'आयकॉन ऑफ द इअर' ठरला आयुषमान खुराणा 

Lokmat Most Stylish Awards 2019: 'बाला'चा कल्ला; 'आयकॉन ऑफ द इअर' ठरला आयुषमान खुराणा 

googlenewsNext

गेल्या वर्षी 'अंधाधून'मधील जबरदस्त अभिनयासाठी प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या आयुषमान खुराणानं २०१९ हे वर्षही गाजवलं. हलकेफुलके विषय, सहजसुंदर अभिनय आणि गोड गळ्यामुळे तो तरुणींच्या गळ्यातला ताईत झाला आहे. या हरहुन्नरी कलाकाराचा यंदाच्या लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात 'आयकॉन ऑफ द इअर' पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 

एकीकडे, 'आर्टिकल 15' सारखा वेगळ्या धाटणीचा संवेदनशील विषयावरचा सामाजिक सिनेमा केल्यानंतर आयुषमाननं 'बाला' आणि 'ड्रीम गर्ल' हे नर्मविनोदी चित्रपटही आपल्या अभिनयाने फुलवले. अर्थात, निखळ मनोरंजनासोबतच या सिनेमांमधूनही त्यानं खूप प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आयुषमानचा पहिला सिनेमा विकी डोनर असो, दम लगा के हैशा असो किंवा बधाई हो; त्याचे सगळे हसवता-हसवता अंतर्मुख करणारे आहेत. बॉलिवूड पडद्यावर आणि बॉक्स ऑफिसवरही ही हटके 'आयुषमान स्टाईल' हिट ठरतेय.

Web Title: Lokmat Most Stylish Awards 2019 Ayushmann Khurrana wins Icon of the Year award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.