Lok Sabha Election 2019: वरूण धवन बनला वयस्कर महिलेचा आधार, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल त्याचे कौतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 17:56 IST2019-04-29T17:56:23+5:302019-04-29T17:56:54+5:30
मतदान केंद्रांच्या बाहेरील वरूण धवनचे काही फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Lok Sabha Election 2019: वरूण धवन बनला वयस्कर महिलेचा आधार, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल त्याचे कौतूक
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत असून आज महाराष्ट्रातील १७ जागांवर मतदान पार पडत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रेटी मतदान केंद्रावर आले होते. या सेलिब्रेटींचे वोट केल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. या कलाकारांमध्ये अजय देवगण, रेखा, करीना कपूर, शिल्पा शेट्टी, करिश्मा कपूर, आमीर खान,ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, रणबीर कपूर व रणवीर सिंग असे बरेच कलाकार मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. इतकेच नाही तर या कलाकारांनी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत मतदान करण्याचे आवाहनदेखील केले. यादरम्यान बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरूण धवन आपले वडील डेविड धवन यांच्यासोबत मतदान करण्यासाठी आले होते.
मतदान केंद्रांच्या बाहेरील वरूण धवनचे काही फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या फोटो व व्हिडिओमध्ये वरूण त्याच्या कुटुंबासमवेत दिसला.
इतकेच नाही तर त्यातील काही फोटोंमध्ये वरूण धवन एका वृद्ध महिलेची मदत करताना दिसतो आहे.
या व्हायरल झालेल्या फोटोत वरूण धवन मतदान करण्यासाठी आलेली वयस्कर महिलेला पायऱ्या चढण्यासाठी मदत करताना दिसला. खरेतर मतदान करून आल्यानंतर फोटो क्लिक करून झाल्यानंतर वरूणची नजर त्या महिलेवर गेली आणि त्याने क्षणाचा विलंब न करता तिच्या मदतीला गेला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढले.
मदतीसाठी धावून आलेल्या वरूणला पाहून ती वृद्ध महिला देखील खूश झाली.
वरूण धवनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर वरूणचा काही दिवसांपूर्वी कलंक चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.
याशिवाय तो रेमो डिसुझाच्या स्ट्रीट डान्सर चित्रपटात दिसणार आहे.
याशिवाय तो त्याचे वडील डेविड धवन यांच्यासोबत कुली नंबर १ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये देखील काम करणार आहे.