ऐका आलियाच्या ब्रेकअपची कहानी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 11:05 IST2016-11-10T19:30:29+5:302016-11-11T11:05:28+5:30
यात ती पिंक फेम अंगद बेदी सोबत दिसतेय.

ऐका आलियाच्या ब्रेकअपची कहानी...
या गाण्याची तुलना जरी ब्रेकअप साँग्सशी करण्यात येत असली तरी ते पार्टी साँग नाही. तरीदेखील हे गाणे तरुणाईला पसंत पडू शकेल असे आहे. ‘जस्ट गो टू हेल दिल’ या गाण्याची सुरुवात फ्लॅशबकपासून होते. यात ती पिंक फेम अंगद बेदी सोबत दिसतेय. गाण्याला पाहून असे वाटते की, आलियाला प्रेमात धोका मिळाला आहे. प्रियकरापासून दूर झाल्याने तिला वेदना होत आहेत. आपले मन ती रमविण्याचा प्रयत्न करीत आहे. या गाण्यात ती खोटे-खोटे हसण्याचा प्रयत्न करताना दिसते. आपला राग आसपास असलेल्या वस्तूंवर काढते, तिला वेड लागले आहे असेही वाटू लागते.
या गाण्यात कुठेही शाहरुख खान दिसत नाही. हे गाणे केवळ आलियावर फोकस करण्यात आले आहे. सुनिधी चौहान व अमित आणि कसूर एमचा आवाज या गाण्यात असून, अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे. यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘डिअर जिंदगी’च्या गाण्याहून याचा अंदाज काही औरच आहे. ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात कुणाल कपूरची महत्त्वाची भूमिका असून, आलिया भट्ट एका फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसेल.
चला तर पाहूया हे गाणे....