ओठांवरून टीका झेलणारी लीजा अखेर बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 22:08 IST2016-06-08T16:38:36+5:302016-06-08T22:08:36+5:30
बॉलिवूड अभिनेत्री लीजा रे हिने अखेर चुप्पी तोडलीच. लीजाला तिच्या ओठांवरून टीका ऐकावी लागत होती. लीजाने ओठांची सर्जरी केल्याचे ...
.jpg)
ओठांवरून टीका झेलणारी लीजा अखेर बोलली
ब लिवूड अभिनेत्री लीजा रे हिने अखेर चुप्पी तोडलीच. लीजाला तिच्या ओठांवरून टीका ऐकावी लागत होती. लीजाने ओठांची सर्जरी केल्याचे टीकाकारांचे म्हणणे होते. पण लीजाने असे काहीही नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी झूंज देणाºया लीजाने यासंदर्भात टिष्ट्वट केले आहे. मी कधीही कुठल्याही प्रकारची सर्जरी केली नाही. मी ओठांची सर्जरी केली म्हणून माझ्यावर टीका करणाºयांवर मला हसू येतयं. ठीक आहे, पण मी कधीही अशाप्रकारची सर्जरी केलेली नाही, हेच मला सांगायचे आहे. गेल्या वीस वर्षांपासूनची माझी छायाचित्रे याचा पुरावा आहेत, असे लीजाने म्हटले आहे. या मुद्यावर लीजाला तिच्या चाहत्यांनीही सपोर्ट केला आहे. १३ वर्षांनंतर गतवर्षी लीजाने ‘इश्क फॉरएवर’द्वारे बॉलिवूडमध्ये वापसी केली होती.
Amused some 'critics' chose to critique my alleged 'lip job'. Well, never had them done.
Twenty years of photographic proof behind me. #LOL