‘बिकिनी’ फोटोद्वारे लिसा हेडनने केली प्रेग्नंसी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 13:51 IST2017-01-12T13:46:22+5:302017-01-12T13:51:14+5:30

लिसा हेडनने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक गोड बातमी देऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आज सकाळी तिने ...

Lisa Hayden announced the pregnancy by 'Bikini' photo | ‘बिकिनी’ फोटोद्वारे लिसा हेडनने केली प्रेग्नंसी जाहीर

‘बिकिनी’ फोटोद्वारे लिसा हेडनने केली प्रेग्नंसी जाहीर

सा हेडनने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक गोड बातमी देऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आज सकाळी तिने इन्स्टाग्रामवर ती आई होणार असल्याची पहिली घोषणा करीत बिकिनीतील एक फोटो शेअर केला आहे.

निळ्या रंगाच्या बिकिनीतील या फोटोत ती ‘बेबी बम्प’ दाखवत आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या लिसाने या फोटोला ‘नम्र सुरुवात’ अशी कॅप्शन दिले. वैयक्तिक आयुष्याविषयी कमालीची गोपनीयता बाळगणाऱ्या लिसाने गेल्या आॅक्टोबर महिन्यात दीर्घकाळपासूनचा बॉयफ्रेंड डिनो लालवानीशी विवाह केला होता.

‘ऐ दिल...’नंतर तिच्याकडे सिनेमांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात येऊ लागले; परंतु ती एकामागून एक नाकारत होती. त्यामुळे तिच्या आई होण्याची कुणकुण इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली होती. आणी आज सकाळी तिने स्वत: यावर शिक्कामोर्तब करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

                                  Lisa MOther

लग्नाप्रमाणेच तिने तिच्या आई होण्याबाबतही कोणाला कोनोकान कळू दिले नव्हते. करिनानंतर आता आणखी लिसाच्या निमित्ताने ‘बॉलीवूड मॉमींची’ संख्या वाढताना दिसत आहे. करिनाने मागच्या महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. तैमुर अली खान असे त्याचे नाव ठेवण्यात आले.

चेन्नईमध्ये जन्मलेल्य लिसाचे बालपण विदेशात गेले. कंगना राणौतच्या ‘क्वीन’मधील तिच्या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती. बॉलीवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिसाने व्होग मॅगझीनसाठी हृतिक रोशनसोबत नुकतेच अत्यंत बोल्ड फोटोशूट केले.

एवढे मात्र खरे की, लिसा अत्यंत सुंदर आई असेल. डिनो आणि लिसा लग्न करण्याआगोदर एक वर्ष एकमेकांना डेट करीत होते. ज्याप्रमाणे करिनाने गर्भावस्थेतील फॅशनला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले त्याचप्रमाणे लिसाकडूनही खूप अपेक्षा आहेत. येणाऱ्या काळात मार्तृत्वाचा आनंद लुटणाऱ्या लिसाचे अनेक फोटो पाहायला मिळतील अशी खात्री आहे.

तिचे बिकिनीतील ‘प्रेग्नंसी’ फोटोपाहून तुम्हाला काय वाटते हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Web Title: Lisa Hayden announced the pregnancy by 'Bikini' photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.