ओळखा पाहू! द ग्रेट खलीसोबत सेल्फीत दिसत असलेला हा प्रसिद्ध गायक कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 21:39 IST2017-11-12T16:08:13+5:302017-11-12T21:39:02+5:30
संगीतकार तथा गायक अदनान सामी याने रविवारी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) सुपरस्टार द ग्रेट खली याची भेट घेतली. दोघांची ...

ओळखा पाहू! द ग्रेट खलीसोबत सेल्फीत दिसत असलेला हा प्रसिद्ध गायक कोण?
स गीतकार तथा गायक अदनान सामी याने रविवारी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) सुपरस्टार द ग्रेट खली याची भेट घेतली. दोघांची ही भेट विमातळावर झाली. यावेळी अदनानने खलीसोबत काही फोटो काढले. त्यातील दोन फोटो त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअरही केले. पहिंला फोटो शेअर करताना अदनानने लिहिले की, ‘अंदाज लावा की, अमृतसर विमानतळावर मी कोणाला भेटलो असेल?’ त्यानंतर अदनानने खलीसोबतचा एक सेल्फी पोस्ट केला. सेल्फीमध्ये अदनानच्या चेहºयाचा काही भागच दिसत असल्याने, त्याचा हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे.
दरम्यान, फोटोमध्ये खलीने पांढºया रंगाचा शर्ट घातलेला आहे. तर अदनान ब्ल्यू टी-शर्टमध्ये दिसत आहे. अदनानचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. कारण या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अदनान खलीच्या खांद्यापर्यंतच दिसत आहे. त्यामुळे त्याच्या मानेचा भागच फोटोमध्ये आला आहे. विशेष म्हणजे अदनानने याचा उल्लेखही त्याच्या दुसºया ट्विटमध्ये केला आहे. अदनानने लिहिले की, ‘जेव्हा द ग्रेट खली सेल्फी काढतो तेव्हा असेच काहीसे होते... प्रेमळ व्यक्ती’
![]()
मात्र अदनानने हे फोटो शेअर केल्यानंतर नेटिझन्सकडून त्याची खिल्ली उडविली जात आहे. युजर्सनी म्हटले की, खली फर्स्ट फ्लोरवर उभा आहे तर अदनान सामी ग्राउंड फ्लोरवर उभा आहे. एक युजर्सने तर, अदनान तू उभे राहण्यासाठी खुर्चीचा वापर का करीत नाहीस?’ असा अजब सल्ला दिला. अदनानचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आला आहे.