'तानाजी'साठी जर्मन ट्रेनर्स सैफ अली खानला देणार अ‍ॅक्शनचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 09:00 PM2019-02-13T21:00:00+5:302019-02-13T21:00:00+5:30

'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून तानाजींची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Lessons of action given to German trainer Saif Ali Khan for 'Tanaji' | 'तानाजी'साठी जर्मन ट्रेनर्स सैफ अली खानला देणार अ‍ॅक्शनचे धडे

'तानाजी'साठी जर्मन ट्रेनर्स सैफ अली खानला देणार अ‍ॅक्शनचे धडे

googlenewsNext

शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून तानाजींची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता अजय देवगन तानाजींची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खानदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

'तानाजी'मधील साहसी दृश्यांचे प्रशिक्षण सैफला देण्यासाठी खास जर्मनीहून टीम येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात अनेक साहसी दृश्य आहेत. त्यामुळे ही दृश्य साकारण्यासाठी लागणारे विशेष प्रशिक्षण जर्मन टीमकडून सैफला देण्यात येणार आहे.
सैफला प्रशिक्षण देण्यासाठी निवडण्यात आलेल्या टीमने आतापर्यंत अनेक साहसी दृश्य चित्रीत करण्यासाठी कलाकारांना मदत केली आहे. मात्र पहिल्यांदाच ही टीम एका बॉलिवूड स्टारला ट्रेन करत असल्याचे समजत आहे. तानाजी चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
 

Web Title: Lessons of action given to German trainer Saif Ali Khan for 'Tanaji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.