लेकीला मॉमच्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 13:42 IST2016-10-28T13:37:04+5:302016-10-28T13:42:44+5:30
एक जमाना गाजविणाºया अन् आता आईच्या भूमिकेत आपल्या लेकीला पदोपदी साथ देणाºया सेलिबे्रटीज मॉम्स पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ...

लेकीला मॉमच्या टिप्स
ए जमाना गाजविणाºया अन् आता आईच्या भूमिकेत आपल्या लेकीला पदोपदी साथ देणाºया सेलिबे्रटीज मॉम्स पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘शिवाय’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी सायशा सैगल हिला तिची आई अन् एकेकाळची बॉलिवूड अभिनेत्री शाहिन बानू पावलोपावली मार्गदर्शन करत आहे. याचा प्रत्यय नुकताच मुंबई येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आला. मराठी माध्यमांशी बोलताना प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा मराठी भाषेत कशा द्याव्यात यासाठी शाहीन सायशाला टिप्स देत होती. विशेष म्हणजे शाहीनने ‘दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’ हे वाक्य सायशाकडून 3-4 वेळा वदवून घेतले. लेकीसाठीची शाहीनची ही धडपड नक्कीच बघण्यासारखी होती; मात्र शाहीनप्रमाणे इतरही काही स्टार मॉम्स आहेत, ज्या लेकीच्या यशात खारीचा वाटा उचलत आहेत.
![]()
उत्तरा खेर : राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ या चित्रपटातून डेब्यू करणाºया संयामी खेरची आईदेखील या झगमगत्या दुनियेशी संबंधित आहे. तिची आई उत्तरा खेरने १९८२ मध्ये ‘मिस इंडिया वर्ल्ड’चा किताब मिळविला होता. तिची ग्लॅमरस जगतात अचानक एंट्री झाली होती. कुठलीही तयारी न करता तिने हा किताब पटकाविला होता. आता संयामीनेही बॉलिवूडमध्ये एंट्री केल्याने तिचे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. कारण संयामीच्या यशात उत्तराचाही तेवढाच वाटा आहे. एक आई म्हणून तिने संयामीला केलेले मार्गदर्शन तिला इंडस्ट्रीत पदोपदी फायदेशीर ठरेल यात शंका नाही. उत्तरा आपल्या लेकीचे नेहमीच मीडियासमोर कौतुक करत असते.
![]()
श्रीदेवी : एकेकाळी बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री असा लौकिक अभिनेत्री श्रीदेवीने मिळवला होता. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. जान्हवी नेहमीच बॉलिवूड पार्ट्यांमध्ये तिच्या ग्लॅमरस लुकमध्ये बघावयास मिळते. ज्या पद्धतीने ती स्वत:ला तयार करीत आहे, त्यावरून ती लवकरच पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे; मात्र तिच्या या ग्लॅमरस अंदाजात आई श्रीदेवीचा मोलाचा वाटा आहे. बºयाचदा तिने आईसोबत पार्ट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावून उपस्थितांना सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे जान्हवीच्या बॉलिवूड एंट्रीमध्ये आई श्रीदेवीचे मार्गदर्शन तिला दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.
![]()
श्वेता बच्चन : महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या चर्चेत नसेल तरच नवल. हॉट आणि ग्लॅमरस अवतारातील तिची झलक सगळ्यांनाच मोहित करणारी आहे. त्यामुळे नव्या आगामी काळात बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल यात शंका नाही. नेहमीच बिनधास्त राहणाºया नव्याच्याबाबतीत तिची आई श्वेता खूपच जागरूक आहे. नव्याचा ग्लॅमरस अंदाज जपताना ती एका स्टार फॅमिलीशी जुळलेली असल्याची जाणीव श्वेता तिला वेळोवेळी करून देत असते. नव्याचे वडील निखिल नंदा राजकपूर यांचे नातू आहेत.
![]()
अमृता सिंग : अतिशय खोडकर आणि तेवढीच डॅशिंग अभिनेत्री म्हणून अमृता सिंगला ओळखले जाते. तिची मुलगी साराच्या बॉलिवूड एंट्रीबाबतदेखील विविध कयास लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने सारा सार्वजनिक ठिकाणी बघावयास मिळत आहे, त्यावरून तिची बॉलिवूड एंट्री निश्चित मानली जात आहे; मात्र साराने अगोदर शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे अशी अमृताची इच्छा असून, सध्या ती तिच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहे. त्याचबरोबर तिचा ग्लॅमरस अंदाज जपण्यातही तिला मदत करत असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळत आहे.