शोमॅन राज कपूरविषयी जाणून घ्या या गोष्टी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 15:48 IST2016-12-14T19:25:07+5:302016-12-16T15:48:23+5:30

द शोमॅन म्हणून राज कपूरची गणना होते. त्यांचे अनेक चित्रपट आजही लोकांना तितकेच आवडतात. मेरा नाम जोकर या चित्रपटात ...

Learn about Shawman Raj Kapoor. | शोमॅन राज कपूरविषयी जाणून घ्या या गोष्टी....

शोमॅन राज कपूरविषयी जाणून घ्या या गोष्टी....

शोमॅन म्हणून राज कपूरची गणना होते. त्यांचे अनेक चित्रपट आजही लोकांना तितकेच आवडतात. मेरा नाम जोकर या चित्रपटात राज कपूर यांच्यासोबत काम केलेल्या क्सेनिया रॅबिनकिया या नुकत्याच भारतात आल्या आहेत. त्यांनी राज कपूर यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना,  त्यांची काम करण्याची पद्धत वेगळीच असल्याचे सांगितले. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात राज कपूरना ओळखले जाते. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून त्यांनी बॉलीवूडवर आपली अमिट छाप सोडली आहे. १४ डिसेंबर हा राजकपूर यांचा वाढदिवस. यानिमित्ताने राज कपूर यांच्या विषयी माहिती नसलेल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत..



चित्रपटाची सुरुवात
वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे १९३५ साली त्यांनी इन्किलाब या चित्रपटातून काम करण्यास सुरूवात केली. ख्यातनाम सिनेअभिनेते पृथ्वीराज कपूर त्यांचे वडील. त्यांनी १२ वर्षे चित्रपटात विविध भूमिका साकारल्या.



नावाविषयी...
राज कपूृर यांचे मुळ नाव रणबीर. आता त्यांचा नातू अभिनेता रणबीर याचेही नाव त्यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.  त्यांचे दोन्ही भाऊ शम्मी आणि ऋषी यांच्याही नावात राजचा समावेश आहे.

युवा दिग्दर्शक
वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजे सर्वात लहान वयाचा दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांना ओळखण्यात येते.  किदार शर्मा यांच्या विषकन्या या चित्रपटात त्यांनी क्लॅपर बॉय म्हणूनही काम पाहिले. दिग्दर्शक होण्यापूर्वी त्यांची इच्छा संगीतकार व्हायची होती.



व्यक्तीगत आयुष्याची प्रतिमा
राज कपूर यांनी ज्या सिनेमांची निर्मिती केली, ती त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याची प्रतिमा मानली जाते. नर्गिस यांच्याबद्दल त्यांना वाटणारे प्रेम त्यांनी विविध चित्रपटातून व्यक्त केले.



समीक्षकांकडून कौतुक
राज कपूर यांच्या चित्रपटाचे समीक्षक आणि चाहत्यांनी कौतुक केले. भारतीय सिनेमांचा चार्ली चॅप्लिन अशीही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांचे चित्रपट नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले.

जगभर चाहते
राज कपूर यांचे जगभरात चाहते होते. मध्य पूर्व आशिया, रशिया, आफ्रिका, चीन, दक्षिणपूर्व आशिया या देशांमध्ये त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. ‘मेरा जुता है जपानी’ हे गीत जगभरात प्रसिद्ध झाले.

अपशयाचे धनी
मेरा नाम जोकर या चित्रपटाच्या अपयशामुळे त्यांना नैराश्य आले. हा चित्रपट दीर्घ लांबीचा होता. पाच तासांच्या या चित्रपटामध्ये दोनवेळा इंटरव्हल घेतला जायचा. हा चित्रपट अयशस्वी झाल्यानंतर ते खिन्न झाले.

क्सेनिया रॅबिनकिना म्हणतात...
मेरा नाम जोकर या चित्रपटात राज कपूर यांच्यासोबत काम करणाºया क्सेनिया रॅबिनकिया यांनी सांगितले की, राज कपूर यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यांनी माझी एक पोज पाहून आर. के. फिल्म्सचा लोगोही तशाच पद्धतीने तयार केला.



चित्रपटाचे अधुरे शूटिंग
त्यांना अस्थमाचा त्रास होता. हीना चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे सुपूत्र रणधीर कपूर यांनी नंतर हा चित्रपट पूर्ण केला. हा चित्रपट तुफान चालला. यावरुन राज कपूर यांचे महत्त्व लक्षात येते.

फाळके पुरस्कार
राज कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता. नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच त्यांच्या छातीत कळा येण्यास प्रारंभ झाला आणि त्यांचे निधन झाले.



 




 

Web Title: Learn about Shawman Raj Kapoor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.